नितळस येथील शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंचांचा शिवसेनेत प्रवेश
सिटी बेल | पनवेल |
शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवसेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते नितळस येथील शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच सुनील काठे, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, रविंद्र काठे व शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
त्याप्रसंगी शिवसेना तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, यतीन देशमुख, रामदास गोंधळी, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, परशुराम भोपी, एकनाथ काठे, शिवसैनिक सिद्देश गुरव आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Be First to Comment