पनवेल महानगरपालिका हद्दीतील पडघे गावात आरोप्लॅनचे लोकार्पण
सिटी बेल | तळोजा |
पडघे येथे पाणी शुद्ध करण्यासाठी नव्याने बसविण्यात आलेल्या ‘रिव्हर्स ऑस्मोसिस’ (आरओ) वॉटर प्लॅन्टचे उद्घाटन बामर लॉरी कंपनीचे पार्थ चटर्जी व नगरसेवक विष्णू जोशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यामुळे पडघे गावातील पाण्याची बिकट समस्या कायमची निकालात निघाली असून गावकऱ्यांना शुद्ध व मुबलक पाणी मिळणार आहे. या शुद्ध पाणी प्रकल्पामुळे नागरिकांची आजारातून मुक्तता मिळणार आहे. त्यामुळे पडघे ग्रामस्थांमध्ये आनंदाची वातावरण पसरले आहे. तर महापालिका हद्दीतील पडघे हे शुद्ध पाणीपुरवठा करणारे पहिले गाव आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या पडघे गावाला गेली अनेक वर्षापासून भेडसावत असलेली पाणी समस्या निकालात काढताना नगरसेवक विष्णू जोशी यांनी अथक परिश्रम घेतला. पडघे गावातील पाणी समस्या कायमची निकालात निघावी म्हणून आमदार बाळाराम पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून तळोजा औद्योगिक विकास मंडळाकडून पाणीपुरवठा करण्यात यावा अशी विनंती केली होती. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एक्सझुक्युटिव इंजिनिअर यांच्याशी बैठक घेवून पडाघे गावचा पाणी प्रश्न कायमचा निकालात काढला.

पडघे गावाला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणुन आमदार बाळाराम पाटील यांनी सक्षम फाउंडेशनकडे विचारणा करताच त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे गावातील माऊली मंदिर, जोशी आली, बैध्द समाज येथील विहरीवर रिव्हर्स ऑस्मोसिस’ (आरओ) बसविण्यात आले आहे. या आरओची एकावेळी १००० लाईटरची क्षमता आहे. यासाठी पनवेलचे विस्तार अधिकारी मेतकर याचेही मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी नाथा पाटील, पांडूशेठ भोईर, वसंत भोईर, भारत कांबळे, कृष्ण पाटील, यशवंत भोईर, गजानन पाटील, गजानन जोशी, सक्षम सक्षम फाउंडेशनचे सुभाष आगवणे, पूनित शर्मा, बोरिल्ड तृप्ती कदम, शुभांगी कदम, पुनम भोईर, ज्योती कांबळे, यांच्यासह पडघे गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








Be First to Comment