Press "Enter" to skip to content

घडले खाकीतल्या माणुसकीचे दर्शन

वाहतूक शाखेचे हवालदार महेश पोतदार यांचे होत आहे कौतुक

सिटी बेल | पनवेल | संजय कदम |

 कर्तव्य बजावित असलेले वाहतूक शाखेचे हवालदार महेश पोतदार यांना मिळालेले रस्त्यात पकलेले पैशाने भरलेले पाकिट व इतर कागदपत्र सदर संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून त्यांना प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अनिल फडके हे बेलापुर ते नेरे पनवेल बाईकवरून घरी परत येत असताना  कळंबोली सर्केल येथे त्यांचे पॉकेट खिशातून पडले आणि ते पॉकेट वाहतूक पोलीस खात्यात कार्यरत असलेले हवालदार महेश पोतदार यांना सापडले, त्यात साडे आठ हजारांची रोकड, एटीएम कार्ड, आधारकार्ड व इतर कागदपत्रे होती. यावरून त्यांनी त्यात असणार्‍या कागदपत्रांवरून अनिल फडके यांचा शोध लावला व त्यांच्याशी संपर्क साधून तुमचे पडलेले पॉकीट मला मिळालेले आहे ते ओळख पटवून घेवून जा, असे सांगितले.

त्याप्रमाणे सोपस्कार पूर्ण करून मुळ मालक अनिल फडके यांना ते पॉकेट प्रामाणिकपणे परत केले. पॉकेट परत मिळाल्याने अनिल फडके यांना आनंद खुप मोठा झाला होता. त्याबद्दल त्यांनी महेश पोतदार यांचे आभार मानले व त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल शाबासकी दिली. आजच्या या धावपळीच्या युगात असे काम करणारी लोकं ही कमीच त्यात अशी माणसे सापडणे म्हणजे दगडात देव शोधण्यासारखे आहे. अशा देव माणसांना मानाचा मुजरा त्यांनी केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.