मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी मानले आयुक्तांचे आभार
सिटी बेल | पनवेल |
गार्डन हॉटेल ते महानगरपालिका कार्यालय या स्वामी नित्यानंद मार्गाचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले होते परंतु, बाजूला करावयाचे पावसाळी पाण्याचे गटार आणि utility duct याचे काम अपूर्ण राहिले होते.या साठी लागणारे जमीन अधिग्रहण अपूर्ण असल्याने या कामात अडथळा आला होता आणि काम प्रलंबित होते.
नागरिकांना यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते.या विषयाला गांभीर्याने घेत माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी सातत्य पूर्ण पाठपुरावा करत सदर विषय त्वरित मार्गी लागण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे आग्रह धरला होता.रस्त्याससाठी आधी जागा अधिग्रहण न केल्यामुळे फक्त रस्त्याचे काम पूर्ण झाले.परंतु फुटपाथ आणि स्ट्रॉम वॉटर ड्रेन चे काम पूर्ण झाले नाही.माजी उपमहापौर विक्रांत पाटील व नगरसेवक नितीन पाटील यांनी नागरिकांच्या भावना समजून घेत हा विषय मार्गी लागण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला होता.अखेर महानगरपालिकेच्या महासभेत हा विषय पटलावर घेऊन या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.
या विषयी सभागृहात बोलताना विक्रांत पाटील यांनी सांगितले की, या कामासाठी कोणतीही वाढीव मुदत न देता केवळ ठरलेल्या वेळेतच काम पूर्ण करेल असा कंत्राटदार नेमावा व आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून हे काम पूर्ण करून घ्यावे तसेच जमीन अधिग्रहण प्रक्रिया ही सोप्या पद्धतीने करावी व या अधिग्रहण विषयाचा नागरिकांना मोबदला काय देणार हे ही त्वरित स्पष्ट करावे. सदर जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावल्याने विक्रांत पाटील यांनी आयुक्त गणेश देशमुख यांचे आभार मानले आहेत.








Be First to Comment