८६००० वीज कामगार,अभियंते व अधिकारी यांना पगारवाढीचा तिसरा हप्ता डिसेंबरच्या पगारात मिळणार
सिटी बेल | मुंबई |
महानिर्मिती,महापारेषण व महावितरण कंपन्यातील ८६००० कर्मचारी,अभियंता व अधिकारी यांची सप्टेंबर २०१९ मध्ये पगारवाढ करण्यात आली होती.पगारवाढ करारापोटी मिळणारी थकबाकीची रक्कम तीन हप्त्या मध्ये देण्याचे तिनंही कंपन्याचे व्यवस्थापनाने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन व इतर कामगार संघटना यांच्या समवेत पगारवाढ करार करताना मान्य केले होते. पहिले दोन पगारवाढीचे हप्ते कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने दिले.मात्र तिसरा हप्ता आर्थिक अडचणीमुळे लांबणीवर पडत गेला.त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
तिसरा हप्ता तात्काळ मिळावा याकरीता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने आॅक्टोबर व नोव्हेंबर २०२१ मध्ये तिन्ही कंपनीचे प्रशासनास आंदोलनाची नोटीस देवुन,बेमुदत साखळी उपोषण महाराष्ट्रभर सुरू केले होते.त्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेमध्ये पारवाढीचा तिसरा हप्ता देण्याचे महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी डिसेंबर-२०२१ मध्ये देण्याचे मान्य केले होते.तिनही कंपनीचे प्रशासनाच्या वतीने तिसरा हप्ता देण्याबाबत प्रशासकीय परिपत्रक दि.२०.१२.२०२१ रोजी निर्गमित करुन डिसेंबर-२०२१ च्या पगार समवेत तिसरा हप्ता देण्याचे आदेश पारित केलेले आहे.तिनही कंपनीचे कार्यरत सेवानिवृत्त व मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना तिसरा हप्ता देण्याकरीता रुपये ३२६.२० करोड खर्च येणार असून दिनांक १ एप्रिल २०१९ ते दिनांक सप्टेंबर २०१९ या सहा महिन्याच्या फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे.
संघटने समवेत झालेल्या चर्चेनुसार प्रशासनाने डिसेंबर-२०२१ मध्ये तिसरा हप्ता देण्याबाबत सूचना निर्गमित केल्यामुळे कामगार,अभियंते व अधिकारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापनचे संघटनेचे अध्यक्ष मोहन शर्मा, कार्याध्यक्ष सी.एम.देशमुख, सरचिटणीस कृष्णा भोयर अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव यांनी आभार मानले आहेत.












Be First to Comment