सिटी बेल लाइव्ह / अलिबाग #
मागील काही वर्षापासुन पालकांचा एकीकडे इंग्रजी माध्यमाकडे सतत वाढत असलेला कल व दुसरीकडे विद्यार्थी संख्ये अभावी बंद होणाऱ्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळा, या दुष्ट चक्रावर मात करीत अलिबाग नगरपालिका उर्दू शाळेचा इयत्ता १०वी चा निकाल 90 % लागला आहे.
यावर्षी आयेशा शेख हिने 91% मिळवून पहिला क्रमांक मिळवला आहे.
शैक्षणिक सामुग्रीचा अभाव, पालकांचे व समाजाचे दुर्लक्ष, शासनाच्या जाचक अटी व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील बहुसंख्य पालक या सर्व समस्यांवर मात करीत केवळ शाळा समितितील कर्तव्य दक्ष सदस्य, समाजातील काही दानशूर व्यक्ति व शाळा समितीचे चेअरमन तथा समाजसेवक श्री. कैसर उस्मान दणदणे यांचे शाळेसाठी लाभलेले योगदान यामुळेच शाळेने हे यश प्राप्त केले आहे. परिसरातील व संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या जिल्हापरिषद व नगरपालिकांच्या शाळांसाठी अलिबागच्या या शाळेने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. शाळेच्या या यशामध्ये अलीबागच्या तत्कालीन नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक व विद्यमान नगराध्यक्ष श्री. प्रशांत नाईक यांचे मोलाचे सहकार्य व मुख्याधिकारी, शिक्षण अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे श्री. कैसर दणदणे यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे रमजान सय्यद, प्रो. साजिद शेख, ऍड. शादाब काटे, नासिर हकीम, इलियाज सय्यद तसेच कमिटीचे सर्व सदस्य आदींनी देखील सहकार्य केले. शाळेच्या या यशाबाबत शाळेचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शाळा समितिचे सर्व सदस्य व चेअरमन श्री. कैसर दणदणे यांच्यावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






Be First to Comment