सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
कोरोना संकटात हि सोन्याचे वाढते भाव पाहून ङोळे पांढरे व्हायची वेळ आली असताना तीन महिला आणि एक पुरूष अशा चौकङीने चौक येथील पेढीवर 73 हजाराच्या मंगळसूञावर हात साफ केल्याची घटना घङली आहे.
गि-हाईक बनून आलेल्या चौघानी सुवर्णकार सागर ओसवाल(कोल्हापूर पेठ चौक ता.खालापूर )यांच्या नकळत 73हजार रूपयांचे मंगळसूञाची चोरी केली असून याबाबत ओसवाल यानी पोलीसात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीन महिला आणि व एक पुरूष मंगळसूञ खरेदिच्या बहाण्याने सागर ओसवाल यांच्या पेढीवर आले होते.हात चलाखीने महिलानी 73 हजार रूपये किंमतीचे मंगळसूञ लंपास केले.त्यानंतर चौघे निघून गेले.चोरीचा प्रकार ओसवाल यांच्या ऊशीरा लक्षात आल्यानंतर त्यानी चौक पोलीसाना माहिती दिली आहे.याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे अज्ञात चार आरोपी विरोधात भा.दं.वि.कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक एस सुतार हे करीत आहेत.






Be First to Comment