उरण तालुक्यातील माणकेश्वर केगाव समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
समुद्रकिनारे स्वच्छ, सुदंर दिसावेत पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व्हावे, पर्यटन वाढीला चालना मिळावी, स्वच्छते विषयक समाजात जनजागृती व्हावी या दृष्टीकोणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी कोकण किनारपट्टी स्वछता मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.या आदेशानुसार उरण पनवेल येथील मनसे कार्यकर्त्यांनी उरण तालुक्यातील माणकेश्वर केगाव समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविली .

ह्या मोहिमेत सहभागी पक्षाचे उपाध्यक्ष महेश जाधव , जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील , नाविक सेना उपाध्यक्ष संदेश ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अविनाश पडवळ, महिला पनवेल अध्यक्षा वर्षा पाचबाई, कळंबोली शहर अध्यक्ष अमोल बोचरे , उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत , विधानसभा सचिव विजय तांडेल , पनवेल शहर अध्यक्ष संजय मुरकुटे , वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष प्रवीण दळवी , सहकार सेना गिरीष तिवारी ,कल्पेश कडू, विवेक बोराडे, रोजगार स्वयंरोजगारचे रामदास पाटील, निर्दोष गोधळी , विभाग अध्यक्ष दिपक पाटील, तुषार म्हात्रे , सतिश पाटील , अशोक वडागले, कैलास माळी आणि शेकडो महाराष्ट्र सैनिक स्वच्छता मोहीम अभियानात सहभागी होते.


महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवर 40 हुन अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला असून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी एकाच दिवशी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत समुद्र किनारा स्वछता मोहीम राबविण्यात आले.








Be First to Comment