काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारी — चारुलता टोकस
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
देशामध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात बलाढ्य असून घटनेच्या नियमानुसार सर्वसामान्य घटकांपर्यंतचा विकास साधतांना सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारी काॅग्रेस पक्षाची विचारधारा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा चारुलता टोकस यांनी पेण येथे केले.पेण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून आज पहिल्यांदाच शहरात जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशच्या उपाध्यक्षा चारुलता टोकस, रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे सहप्रभारी श्रीरंग बरगे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब नेने, वसंत आठवले, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, तालुकाध्यक्ष अशोक मोकल, शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, निलेश पाटील, हिदु कुवारे, टिळक आदिंसह शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना चारुलता टोकस म्हणाल्या की, देशात भाजप हा समाजासमाजात तेढ निर्माण करून राजकारण करीत आहे पुर्वीच्या काळातील इंग्रजांचा फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून देशात सामाजिक वातावरण दूषित करून स्वतःचे राजकीय हीत साधत आहेत मात्र देशाने अशा लोकांना आता ओळखले आहे त्यामुळे येणारा काळ हा काॅग्रेस पक्षाचाच असणार असून या प्रवाहात अनेक जण सामिल होत आहेत.काॅग्रेस ही विचारधारा देत असल्याने प्रवीण पाटील सारखा कार्यकर्ता निष्ठावान राहिला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

तर जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले की, काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आजही काँग्रेसच्याच सोबतच आहे.काँग्रेससाठी लवकरच पुन्हा सुगीचे दिवस येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी करून कार्यकर्त्यांनी तळागळातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडण्याकरिता कामाला लागेल पाहिजे असा आदेश देऊन शहरात प्रवीण पाटील यांने मोठा जनसंपर्क वाढविला असल्याने येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला त्याचा निश्चितच फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भारतीय दलाचे सीडीएस बिपीन रावल व इतर सहकारी यांचे हॅलिकाॅटर अपघातात निधन झाल्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.








Be First to Comment