जिल्हा परिषद सदस्या उमाताई मुंढे यांचे मानले आभार
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
शिवनगर हद्दीत येणाऱ्या शिवनगरवाडी, शिवनगर रिसवाडी, शिवनगर पानशिलवाडी या परिसरातील आदीवासी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.पाणीटंचाईंची झळ लागल्याने आदीवासी महिलांना एक ते दिड किमी पायवीट करुन दूरवरून पाणी आणावे लागत आहे.येथील आदीवासी बांधवांनी ग्रामपंचायतीला अनेकवेळा कळवूनही पाणी समस्या सुटत नसल्याने त्यांच्यात तीव्र संताप दिसत होता.शिवाय काहीवेळा बोअरवेलचे पाणी आणून पिण्यासाठी त्याचा वापर होत असल्याने लहान मुले आजारी पडायची.हि समस्या शिवनगर हद्दीतील रिसवाडी आदीवासीवाडी आणि पानशिल आदीवासीवाडी येथील महिलांनी जिल्हा परिषद सदस्या उमाताई मुंढे यांच्या निवासस्थानी जाऊन व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या उमाताई मुंढे यांनी आपले पती देव माजी सरपंच संदिप मुंढे यांना सांगताच दुसऱ्याच दिवशी या आदीवासी बांधवांना पाण्याची समस्या सोडविण्यासाठी काम सुरू केले.माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या प्रयत्नातून शिवनगर रिस आदीवासीवाडी आणि पानशिल आदीवासीवाडी येथील ब-याच वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पंधरा दिवसांतच मार्गी लावला.या कामाचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्या उमाताई संदिप मुंढे व सरपंच ताईं पुंडलिक पवार यांच्याहस्ते करण्यात आले.

शिवनगर हद्दीतील आदीवासी बांधवांचा पाणीप्रश्न मार्गी लागल्याने त्यांनी जिल्हा परिषद सदस्या उमाताई संदिप मुंढे यांचे आभार मानले.यावेळी माजी सरपंच संदिप मुंढे,माजी प्रभारी सरपंच राकेश खारकर, ग्रामपंचायत सदस्य अंजना भोईर, सदस्य जयराम पाटील, सदस्य संतोष मैदर्गींकर, सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाटील,कुरंगळे, अजित भोईर, अनंता पाटील आदी उपस्थित होते.








Be First to Comment