Press "Enter" to skip to content

कडाव ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

कर्जत तालुक्यातील कडाव येथील स्मशानभुमी तसेच तलावाची केली स्वच्छता

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत हद्दीतील माणकिवली येथील स्मशानभुमीची दयनीय अवस्था झाली होती. ग्रामपंचायतीने स्मशानभुमी तसेच तलावाची केली स्वच्छता केली आहे.

जंगली गवत, झाडी झुडुपे वाढुन स्मशानभुमीला जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सदर स्मशानभुमी येथे कडाव, माणकिवली, ठोंबरवाडी आदि गावांतील मृत व्यक्तींचा अंत्यसंस्कार होत असतात. परंतु, पावसाळ्यात येथे भरमसाठ प्रमाणात रानटी गवत, झाडी झुडुपे तसेच शेजारील तलावात अती प्रमाणात जलपर्णी वाढल्याने अंत्यसंस्कार व दशक्रिया विधि करण्यास येणाऱ्या नागरिकांना अडथळा होत होता. त्यामुळे कडाव ग्रामपंचायतीमार्फत सदर स्मशानभुमी व तलावाची स्वच्छता ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक किसन पवार व सदस्या सुषमा चेतन पवाळी ह्यांच्या देखरेखीखाली करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.