Press "Enter" to skip to content

बोर्ली येथे साने गुरुजी विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा

दूरदृष्टी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा गाभा – वामन चुनेकर

सिटी बेल | बोर्ली मांडला | अमूलकुमार जैन |

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध खात्याचे मंत्रिपद सांभाळताना वीज, पाणी, स्त्री-पुरुष समानता, लोकसंख्या आदी विषयांचा विचार करून विधेयक आणण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक गोष्टीत त्यांचा प्रचंड अभ्यास होता. दूरदृष्टी हा त्यांच्या विचारांचा गाभा होता, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर यांनी बोर्ली येथील साने गुरुजी विद्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत केले.

या वेळी बोलताना चुनेकर यांनी बाबासाहेबांनी शेती, मतदानाचा अधिकार, पाणी, वीज, घटनात्मक संरक्षण, स्त्री-पुरुष समानता या प्रश्नांवर ज्या भूमिका मांडल्या त्याबद्दल विस्तृत विवेचन केले. 1918मध्ये त्यांनी शेती ही बोजा होणार आहे. म्हणून तिला जोडधंद्याची गरज आहे. त्यासाठी कुटुंबातील काही सदस्यांनी उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्राकडे वळण्याची गरज असल्याचे मत मांडले होते. शेतकºयांच्या आत्महत्या वाढीला लागल्या असताना त्यांनी त्या काळात मांडलेले मते महत्त्वाची वाटतात. तसेच बायबासाहेबांनी 1927 मध्ये भारतातील सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, असे मत मांडले होते. 1928 ते 30 दरम्यान आदिवासी अस्पृश्य आणि इतर मागासवर्ग यांना घटनात्मक संरक्षणाची गरज आहे, असे मतही मांडले होते. इतर मागासवर्गीयांची जातवार जनगणना व्हावी ही मागणी आज पूर्ण झाली असली तरी बाबासाहेबांनी 1946मध्येच मागणी केली होती. पाणी आणि वीज या बाबतीत धोरण आणि नीती तसेच कायदेशीर बाबीही दूरदृष्टीने बाबासाहेबांनी मांडल्या होत्या, असेही चुनेकर यांनी सांगितले.

कुटुंब नियोजनाचा मुद्दा आपल्या राजकीय अजेंड्यावर आणणारे बाबासाहेब पहिले राजकीय नेते होते. स्त्रियांच्या प्रगतीवरून देशाची प्रगती मोजली जावी, हा मापदंड त्यांनी मांडला होता. जातीव्यवस्था असेपर्यंत स्त्रीमुक्ती अशक्य आहे. जन्मदर नव्हे तर पोषणदर महत्त्वाचा आहे. स्त्री-पुरुष समानता अत्यंत महत्त्वाची आहे. याकडेही बाबासाहेबांनी गांभीर्याने लक्ष वेधले होते, बाबासाहेबांनी दिला जगण्याचा नवा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून जगण्याचा नवा मंत्र दिला, असे बोर्ली सरपंच चेतन जावसेन सांगितले.

यावेळी बोर्ली उपसरपंच मतीन सौदागर,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष अमूलकुमार जैन,सामाजिक कार्यकर्ते मनोहर भोपी,साने गुरुजी मुख्याध्यापक सोपान अडसरे,आणि विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.