सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
देवळोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयदास वामन पाटील यांची गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.देवळोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकताच संपन्न झाली.यावेळी ग्रामसभेमध्ये देवळोली गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी जयदास वामन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान जयदास पाटील यांनी आपल्या सरपंच काळात विकासकामे केल्याने त्याची नागरिकांनी त्यांना पोहोचपावती दिल्याचे दिसून येते.त्यांची देवळोली तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याने जयदास पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment