Press "Enter" to skip to content

कर्नाळा सर्कल परिसर होणार वाहतूक कोंडीपासून मुक्त

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरातील पनवेल शहर वाहतूक शाखेच्या हद्दीतील कर्नाळा सर्कल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक, टपाल नाका, गुरु नानक चौक, आयडीबीआय बँक, भाजपा पार्टी ऑफिस, रुपाली सिनेमा टॉकीज अशा विविध बाजूनी येणारे रोड एकत्र येतात याठिकाणी जवळच बाजारपेठ, भाजी मार्केट व बँका असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होत होती. या संदर्भात वाहतूक शाखेने विविध उपाय योजना करून तो परिसर वाहतूक कोंडी मुक्त करण्याचा संकल्प केला आहे.

कर्नाळा सर्कल हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने व सदर परिसरात विविध आस्थापना असल्याने सदरचा परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो कर्नाळा सर्कल हा परिसर अतिशय दाटीवाटीचा असल्याने व सदर परिसरात नागरिकांची नेहमीच जास्त वर्दळ असल्याने त्या परिसरात वाहतूकिची प्रचंड कोंडी होत असते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास याठिकाणी तात्काळ मदत पाठविण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते या हेतूने वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या आदेशाने कर्नाळा परिसरातील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने कर्नाळा सर्कलकडे येणार्‍या कर्मवीर भाऊराव पाटील चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक , रुपाली सिनेमा या तिन्ही बाजूंच्या रस्त्यावर कर्नाळा सर्कलपासून 20 मीटर अंतरापर्यंत कोणतेही वाहन रस्त्यावर पार्क करण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनानुसार वाहतूक पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी करून कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे सर्कल सुद्धा लहान करण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडी मुक्त परिसर लवकरच आपल्याला पाहण्यास मिळणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.