Press "Enter" to skip to content

समाज कल्याण सभापती दिलीप भोईर “दिव्यांगाचा आधारवड” पुरस्काराने सन्मानित

दिव्यांगासाठी काम करणारे वैद्यकीय अधिकारी यांना विशेष पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस करणार :- आमदार महेंद्र दळवी

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ विक्रमजीत पडोळे यांनी कोव्हिडं काळात ज्या दिव्यांगाना कोव्हिडं झाला हॊता त्यांची शासनाच्या विशेष पुरस्कारासाठी शिफारस करणारा असल्याचे अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात केले.

यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगीता पारधी,रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ, अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी,कामगार नेते दीपक रानवडे,महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साळुंखे, रायगड जिल्हा विधी प्राधिकरण सचिव संदीप स्वामी, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ विक्रमजीत पडोळे,जिल्हा समाज कल्याण अधिकारीगजानन लेंडी, सहाय्यक सल्लागार किशोर वेखंडे,महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार, आई फाउंडेशनचे उपाध्यक्ष सागर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी सांगितले की,जगात कोणी हुशार माणूस असेल तो दिव्यांग बांधव आहे.दिव्यांग बांधव यांच्याकडे विविध कला आहेत.त्याची ते जोपासना करीत आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगीता पारधी यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांगासाठी विविध योजना राबवित आहेत.समाज कल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांना दिव्यांगाचा आधारवड म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.समाज कल्याण सभापती यांनी कोव्हिडं काळात चांगले काम केले होते.तसेच त्यांचे दिव्यांगाच्या प्रेमापोटी त्यांनी त्यांचे दालन सोडून ते स्वागत कक्षात आपली खुर्ची आणून ठेवली होती.त्यांनी दिव्यांगासाठी प्रशस्त अशी वातानुकूलित कक्ष तयार करून दिला आहे.तो कक्ष महाराष्ट्रातील एकमेव कक्ष आहे.

समाज कल्याण अधिकारी गजानन लेंडी यांना समाजकल्याण विभाग हा पाठ आहे त्याचा फायदा सभापती यांनी घेत जिल्हयातील नागरिकांसाठी अहोरात्र झटत आहेत. काही सदृढ लोकांचा अपंगांकडे बघण्याचा दुर्ष्टीकोन हा वेगळा आहे तर काही जण अपंग हे आपल्यातील एक घटक आहे असे मानून त्यांच्या काळानं वाव(प्रोत्साहन) देण्याचे कार्य करीत असतात दिव्यांगाची एकी काय असते हे अपंगांनी रायगड जिल्ह्यात दाखवून दिले आहे, दिव्यांगासाठी शासनाच्या विविध योजना आहेत मात्र त्याची माहिती त्यांच्यापर्यन्त पोहचविणे गरजेचे आहे. एकीमुळेच शासनाला झोपेतून जागे करण्याचे महत्ववपूर्ण काम रायगड जिल्ह्यातील अपंगांनी केले असेही गौरवूद्दगार त्यांनी वेळी केले.

दिव्यांगासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सरकारच्या प्रयत्नांतून राज्य शासन त्यांच्यासाठी विविध योजना राबवित आहे.सरकारचा आमदार असल्याने सरकार हे सदैव आपल्या पाठीशी आहे.तसेच दिव्यांग यांना जलवाहतूक प्रवासातही सवलत मिळेल यासाठी निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी सांगितले की,मी सुद्धा शंभर टक्के दिव्यांग असणाऱ्या मुलाचा बाप असल्याने दिव्यांगाच्या वेदना काय असते त्याची मला माहिती आहे.म्हणून माझ्या समाजकल्याण सभापती काळाच्या दुसऱ्या काळात मी दिव्यांगासाठी काम करीत असणाऱ्या कर्मचारी आणि तेथे येणाऱ्या दिव्यांग बांधवांना बसण्यासाठी प्रशस्त दालन असावे म्हणून जोपर्यंत दिव्यांग याना दालन मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या दालनात न बसण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार मी माझ्या दालनात असणारी सभापतींची खुर्ची स्वागत कक्षात आणून ठेवली आणि मी माझा कारभार तेथे बसून सुरू केला.मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांनी मला आश्वासन दिले लवकरच दिव्यांगासाठी दालन तयार करण्यात येईल असे सांगत माझी खुर्ची परत माझ्या दालनात नेण्यात आली. त्यांनतर पाच दिवसांत दिव्यांगासाठी नवीन दालनाचे काम सुरू करण्यात आले.त्याचप्रमाणे माझा दिव्यांगाचा आधारवड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तो सन्मान डॉ पडोळे यांचा आहेतरी त्याचा दिव्यांगाच्या आधारवड पुरस्काराने सन्मान करण्यात यावा अशी मागणी केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे मागणी केली की,दिव्यांगाना जलवाहतूक प्रवासात सवलत मिळावी तसेच आपला जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा असल्याने दिव्यांग बांधवांना त्या त्या विभागात स्टॉल मिळावे, कारण त्यांना स्टॉल मिळाल्यास ते आपली उपजीविका करू शकतील त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आप्पा काळेल,शिवाजी पाटील,शैलश सोनकर, विष्णू पाटील,संतोष माने,अकिल पठाण सहित आदीने परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.