Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यातील वीटभट्टी उत्पादकाची रॉयल्टीत सवलत व मुदतवाढीची मागणी

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

गेल्यावर्षी कोविडच्या प्रादुर्भावामुळे तर यंदा लहरी हवामानामुळे विट उत्पादन करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. डिसेंबर महिना उजाडला तरी अद्याप विट उत्पादन करायचे की नाही ? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील वीटभट्टी उत्पादकांनी एकत्र येत कर्जत तहसीलदारांना रॉयल्टीमध्ये सवलत व भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी असे निवेदन देण्यात आले.

वीटभट्टी व्यवसाय सुरू करण्यापासून अनेक अडचणी निर्माण होत असल्याने तसेच अचानक येणाऱ्या अवकाळी पाऊस या मध्ये वीटभट्टी नुकसान होत असते परिणामी उत्पादन कधी सुरू करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढे कालावधी सुद्धा कमी रहाण्याची शक्यता असल्याने विट उत्पादकांनी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी भेट घेऊन रॉयल्टी भरण्याची मुदत वाढवावी. असे निवेदन दिले.

या प्रसंगी रविंद्र देशमुख, पंढरीनाथ राणे, रविंद्र भोईर, शैलेश पाटील, संतोष बोराडे, सरफराज मुल्ला, जयंता भोईर, नरेश भोईर, चंद्रकांत शेळके, रविंद्र शेळके, मन्सूर मालदार, अंकुश भोईर, चंद्रकांत हगवणे, हनिस हवालदार, रामदास शेळके, कुमार गंगावणे, अशोक पाटील, महेंद्र जाधव, नंदू लाड, जयेंद्र मुने, अतुल काळोखे, प्रभाकर पाटील, हनुमंत पाटील, प्रकाश बागडे, झाकीर कर्णेकर, राजेंद्र गंगावणे, राजेश कर्णूक, किशोर दळवी वीट उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.