Press "Enter" to skip to content

चिंचवली येथील जुने वीज खांब महावितरण ने बदलले

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील मौजे चिंचवली येथील 8 खराब झालेले विज खांब महावितरण कडाव विभागाचे सहाय्यक अभियंता रितेश साबदे यांनी त्वरित बदलले आहेत.

युवासेना कर्जत तालुका सचिव अ‍ॅड.संपत हडप हे सातत्याने पाठपुरावा करत होते. चिंचवली येथील खराब झालेल्या वीज खांबांचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याच्या पाठपुराव्याला यश आले आणि गावातील खूप वर्षांपासून सडत पडलेले वीज आज खऱ्या अर्थाने बदलून गावातील मुख्य समस्या दूर झाली. सडलेले एखादा वीज खांब चुकून जर पडला असता तरी मोठी जीवितहानी झाली असती हे गांभीर्य लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत वीज खांब बदलले गेले पाहिजेत या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन गेली तीन दिवस काम सुरू होते. आणि आज काम खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण काम पूर्ण झाले. त्यामुळे गावातील खूप मोठी विजेची समस्या दूर झाली.

जुने वीज खांब काढून त्या ठिकाणी नविन खांब टाकण्याचे काम सुरू असताना

काही दिवसात उर्वरित गणेगाव आणि चिंचवली या दोन्ही गावातील वाढत्या वस्ती मधील आणि खराब झालेले विजखांब बसविण्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन उपकार्यकरी अभियंता प्रकाश देवके आणि सहाय्यक अभियंता साबदे यांनी अ‍ॅड.संपत हडप यांना दिले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.