Press "Enter" to skip to content

सर्वोत्कृष्ट स्तंभ लेखनासाठीचा मालिनी शिरोळे पुरस्काराने डॉ. नितीन आरेकर सन्मानित

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत मधील रहिवाशी आणि उल्हासनगर येथील सी एच एम महाविद्यालयात प्रा. असलेले डॉ. नितीन आरेकर यांना सर्वोत्कृष्ट स्तंभ लेखनासाठीचा मालिनी शिरोळे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2018 मध्ये लोकसत्तेच्या लोकरंग या रविवारच्या पुरवणीमध्ये प्रीतम हॉटेलचे सर्वेसर्वा सरदार कुलवतसिंग कोहली यांच्यासाठी ‘ये है मुंबई मेरी जान’ या सदराचे शब्दांकन करायची संधी संपादक गिरीश कुबेर यांनी डॉ. नितीन आरेकर यांना दिली होती, त्यांना आरेकर यांचे नाव ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते यांनी सुचवले होते.
या सदराचे राजहंस प्रकाशनाने सुंदर पुस्तक तयार केले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेने या पुस्तकास सर्वोत्कृष्ट स्तंभ लेखनासाठीचा मालिनी शिरोळे पुरस्कार डॉ. नितीन आरेकर यांना ख्यातनाम तत्वज्ञ, विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी मसापचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी व कोषाध्यक्ष सुमित्राराजे पवार आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.