सिटी बेल | मुंबई |
शिवाजी पार्क दादर मुंबई येथे शेकडो कामगार व शेतकरी यांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीला अभिवादन करून किसान व कामगार संघर्ष अस्थीकलश यात्रेचे आगमन बाबू गेनू पुतळा परळ येथे झाले.त्यानंतर मंत्रालय समोरील महात्मा गांधीच्या पुतळ्याला अभिवादन करून जाहीर सभा घेण्यात आली.व सायंकाळी पाच वाजता अस्थिकलश यात्रेचा समारोप अस्थिकलशाचे विसर्जन गेटवे ऑफ इंडिया येथे करण्यात आले.

यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक,आमदार विद्या चव्हाण,किसान नेते राजाराम सिंग (बिहार),कॉम्रेड अशोक ढवळे, कॉम्रेड प्रकाश रेड्डी,कॉम्रेड मिलिंद रानडे, नामदेव गावडे, डॉक्टर अजित नवले,शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील,उल्का महाजन,प्रतिभा शिंदे,कामगार नेते विश्वास उटगी,कॉम्रेड कृष्णा भोयर,बबली रावत,डॉक्टर विवेक माॅटोरो,संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी व कामगार कष्टकरी यांच्या उपस्थिती मध्ये अस्थिकलश यात्रेची सुरूवात झाली.

शेतकरी आंदोलनाला दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे.१ वर्षाच्या कालखंडात आंदोलन करणारे देशातील ७०० वर शेतकरी शहीद झाले. त्या शेतकऱ्याच्या अस्थिकलश यात्रेचा समारोप दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी आजाद मैदान मुंबई येथे होत आहे.या आंदोलनाला देशातील शेतकरी नेते संबोधित करणार आहेत.

मुंबई येथील अस्थिकलश यात्रेचे आयोजन संयुक्त किसान मोर्चा,जनआंदोलनाची संघर्ष समिती व कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये समारोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,शेतकरी कामगार पक्ष,आप पक्ष, समाजवादी पक्ष इतर समविचारी पक्षांचे नेते,कामगार नेते तसेच जनआंदोलनाच्या संघर्ष समितीचे नेते सहभागी झाले होते.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे भांडुप, कल्याण,नाशिक,वाशी पारेषण झोन व मुख्य कार्यालय झोन मधील पदाधिकारी व सभासद यांनी आपल्या संघटनेचे बॅनर व झेंडे घेऊन फोरव्हिलर गाड्या घेवून शिवाजी पार्क दादर मुंबई येथे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर,उपसर्चिटणीस अरुण मस्के,संयुक्त सचिव कॉंग्रेस लिलेश्वर बनसोड, महिला आघाडीच्या अध्यक्षा कॉम्रेड भारती भोयर,केंद्रीय सल्लागार धनवटे मामा,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य गोरखनाथ पवार,शंकरदादा कोंडी लकर,आयटक ठाणे जिल्हा सचिव कॉम्रेड जनार्धन पाटील,भांडुप झोन सचिव विजय नाटकी, उपाझोनल सचिव सचिव जगदीश म्हात्रे, राजेश अहिरे,बुवा,राहुल मुळे, वाशी पारेषण झोन अध्यक्ष सुरेशस पवार,सचिव दिलीप पाटील, वाशी मंडळ सचिव शशिकांत मात्रे,कल्याण मंडळ सचिव सतीश म्हात्रे,महादेव गायकवाड, नाशिक सर्कल सचिव दिपक गांगुर्डे,सतीश पाटील,कॉम्रेड एस.आय.खान,विभागीय सचिव सतिष पाटील,योगेश साळवी, रितेश चव्हाण,दिपक दामधर, अतुल चव्हाण,रवींद्र सिंग चव्हाण,स्वप्निल राणे, अशोक बामगुडे व दिनेश पाटील, मुख्य कार्यालय झोनचे प्रतिनिधी कॉम्रेड विनोद गायकवाड इत्यादी पदाधिकारी सहभागी झाले होते.












Be First to Comment