अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संकारात्मक चर्चेनंतर निर्णय
सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |
राज्यातील रेशन दुकानदारांनी 1 डिसेंबरपासून पुकारलेला संप मागे घेतला आहे. मुंबईत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.
150 रूपये प्रतिक्विंटल मिळणारे कमीशन वाढवून 270 रूपये करावे, इ पॉस मशिन अद्यावत कराव्यात, एफसीआयची खरेदी केंद्र सुरू करावीत , चांगल्या दर्जाचे धान्य पुरवावे आदि मागण्यांसाठी राज्यभरातील 50 हजार 500 रेशन दुकानदार संपावर जाणार होते. कोरोना काळात 107 रेशन दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय त्यांच्याबाबत शासनाने सहानभुती पूर्वक विचार करावा अशीदेखील रेशन दुकानदार संघटनेची संघटनेची मागणी आहे.
राज्यातील गरीबांचे अन्नावाचून हाल होवू नयेत या हेतूने आम्ही संप स्थगित केला असला तरी तो मागे घेतलेला नाही असे राज्य संघटनेचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी स्पष्ट केले.








Be First to Comment