Press "Enter" to skip to content

२८ नोव्हेंबरला आझाद मैदाना मध्ये शेतकरी व कामगार यांची महापंचायत होणार

महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष, जनसंघटना व कामगार संघटना यांची संयुक्त बैठक संपन्न

शेतकऱ्यांचे राष्ट्रीय नेते राकेश टिकेट,दर्शन पाल अतुलकुमार अंजान व हहन मुल्ला संबोधित करणार

सुधारित विद्युत कायदा २०२१ ला संयुक्त किसान मोर्चा प्रचंड विरोध

सिटी बेल | मुंबई |

इस्लाम जिमखाना मुंबई येथे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाअध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आमदार विद्याताई चव्हाण,शेतकरी कामगार पक्ष,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,लाल निशाण पक्ष,आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष इत्यादी समविचारी पक्षाची तसेच जनआंदोलनाची संघर्ष समिती व कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली.

या बैठकीत लखिंपुर खेरी घटनेचा निषेध करण्याकरता काढलेल्या अस्थिकलश यात्रेचा समारोप मुंबई मध्ये दि.२८ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान येथे महापंचायत घेऊन करण्यात येणार आहे. पंचायतीला संयुक्त मोर्चा चे राष्ट्रीय नेते मा.राकेश टिकेट, दर्शन पाल अतुलकुमार अंजान व हहन मुल्ला इत्यादी संबोधित करणार आहे.

दि.२७ नोव्हेंबर रोजी अथीकलश यात्रा सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क येथून सुरू होऊन,बाबू गेनू यांच्या पुतळ्याला जाईल त्यानंतर मंत्रालयात समोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ समारोप होईल. मंत्रालय समोर होणाऱ्या समारंभास मा.खासदार शरदचंद्रजी पवार, मा.मंत्री बाळासाहेब थोरात तसेच विविध पक्षातील नेते,जन आंदोलनाच्या संघर्ष समितीचे नेते,कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेते एकत्रितपणे हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून जनसमुदायाला संबोधित करतील.

दि.२४.११.२०२१ रोजी दुपारी २.०० वाजता प्रेस क्लब मुंबई येथे राजकीय पक्ष, जनआंदोलनाची संघर्ष समिती व कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दि.२७ व २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या श्रद्धांजली सभा व महापंचायत मध्ये सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात येईल.

सर्व पक्षीय व जनसंघटनाच्या बैठकी मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस तसेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने कामगार नेते कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी भूमिका मांडताना सांगितले की, केंद्र सरकारने सुधारित विद्युत कायदा २०२१ संसदेच्या चालू अधिवेशनात मध्ये मांडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यास नॅशनल कोऑडीनेशन कमिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्पलॉइज अंड इंजिनियर्स ने विरोध करण्याचा निर्णय घेतलेला आहे.संयुक्त किसान मोर्चाने सुद्धा प्रमुख मागण्यांमध्ये विद्युत कायदा २०२१ ला विरोध केलेला आहे.महाराष्ट्रातील विद्युत मंडळाच्या विभाजित महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या कंपन्या सध्या अत्यंत आर्थिक अडचणीत असून महावितरण कंपनीची थकबाकी रू.७३००० कोटी रुपये आहे.ही थकबाकी वसूल झाली नाही तर महावितरण कंपनी डबघाईला येईल व केंद्र सरकार तिन्ही कंपन्यांचे खासगीकरण करा म्हणून राज्य सरकारवर दबाव आणेल म्हणून राज्य सरकारने सर्व पक्षाला आव्हान करावे विकलेल्या विजेचे पैसे वसुल करत थकबाकी वसुली करता करीता महावितरण कंपनीस मदत करून आर्थिक सहाय्य देऊन हा सार्वजनिक उद्योग वाचवणे गरजेचे आहे.अन्यथा सर्व नफ्याचे क्षेत्र खाजगी भांडवलदार याच्या ताब्यात जातील व ग्रामीण भागाला वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची राहील व महावितरण कंपनी आर्थिक कारणामुळे डबघाईला येईल हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यामुळे आपण लक्ष घालावे.

नानाभाऊ पटोले म्हणाले की, हा जनतेच्या मालकीचा उद्योग आहे हा टिकणे गरजेचे आहे. म्हणून मी सर्व पक्षांना विनंती करतो की वीज कंपन्यांची परिस्थिती सुधारण्या करीता एकमेकांच्या हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे.हा उद्योग जनतेच्या मालकीचा आहे व तसाच राहिला पाहिजे हे काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.मी माझ्या सहकारी पक्षांना सुद्धा याबाबत आवाहन करतो जेवढी मदत शक्य असेल तेवढी करण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन केले.

संयुक्त किसान मोर्चा ने आयोजित केलेल्या दिनांक २७ व २८ नोव्हेंबर ला आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या महापंचायत मध्ये मोठ्या प्रमाणावर भागीदारी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन नेतृत्वाखाली राज्यातील हजारो कामगार, अभियंते व अधिकारी यांनी भागीदारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

कॉम्रेड कृष्णा भोयर
राष्ट्रीय कौन्सिल सदस्य
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.