प्रकल्पाला सहकार्य करण्यातच सर्वांचे हित- पीसीएल कंपनीच्या बाबत चुकीच्या वृत्ताला व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण
सिटी बेल | तळोजा एमआयडीसी |
दैनिक नौराष्ट्र मध्ये दिनांक १५/११/२०२१ रोजी प्रसिद्ध झालेलया बातमी संदर्भात परफॉर्मन्स केमिसर्व्ह लिमिटेडच्या व्यवस्थपनाकडून स्पष्टीकरण देण्यात येते कि, “माननीय आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वा खाली मोर्चा स्थगित करून तोंडरे प्रकल्पग्रस्थांच्या मागण्या मान्य” या मथळ्या खाली प्रसिद्ध झालेली बातमी अपूर्ण व अर्धवट माहितीच्या आधारे देण्यात आली आहे आणि दिशाभूल करणारी आहे.
प्रथमतः तोंडरे गावाला फ्लेमिंगो कंपनी ते तोंडरे या रस्त्याच्या मागणी बाबत कोणतीही सविस्तर चर्चा अथवा निर्णय कंपनी सोबत झालेल्या सभेत झाला नाही. सभेत झालेल्या प्राथमिक चर्चेत सोसायटीच्या प्रलंबित विषयांबाबत चर्चा होऊन मार्ग काढण्यात आला. परंतु चर्चेला न आलेल्या विषयांबाबत चुकीच्या बातम्या पसरवुन तोंडरे गावातील शेतकर्यांची दिशाभूल करणारे चुकीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
जय म्हसोबा सोसायटी व श्री म्हसोबा सोसायटी अश्या तोंडरे गावातील शेतकऱ्यांच्या दोन संघटना आहेत. श्री म्हसोबा सोसायटी सोबत झालेल्या चर्चेप्रमाणे सोसायटीला इमारत साहित्य पुरवठा करण्याचे स्वतंत्र काम देण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रकल्प व्यवस्थापनाने तोंडरे ग्रामस्थांना दोन्ही सोसायटीने प्रकल्पाला एकत्रित सहकार्य करावे असे नेहमीच अवाहन केले आहे. परंतु सोसायटीमधील काही मतभेदांमुळे कंपनी व्यवस्थापनाने दोन्ही सोसायटींना वेगवेगळे काम देण्याचे ठरवले त्याचप्रमाणे दोन्ही सोसाटीचे एक संयुक्त बँक खाते ठेवण्याची विनंती देखील केली आहे. त्यामुळे कोणताही वादविवाद होणार नाही व दोन्ही सोसाटीसोबत समन्वय ठेवणे देखील सोपे होईल. तथापि, श्री म्हसोबा सोसायटीला हे मान्य नसल्याने कंपनी व्यवस्थापनाने दोन्ही सोसायटीला वेगवेगळे काम येईल असे ठरविण्यात आले.
यावर तोडगा काढण्यासाठी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली आणि 24/06/2021 रोजी सहमती पत्र करण्यात आले. त्यानुसार श्री म्हसोबा सोसायटीला ठेकेदांराकडून इमारत साहित्य पुरवण्याचे काम देण्यात आले. परंतु सोसायटी आवश्यक असलेल्या तांत्रिक, व्यावसायिक आणि गुणवत्ते बाबत पूर्तता पूर्ण करू शकली नाही. तद्नंतर व्यवस्थापन व सोसायटी यांचेमध्ये समन्वय ठेवण्यासाठी मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्या सभेला देखील सोसायटी सभासद उपस्थित नव्हते.
म्हणुन या प्रलंबित बाबींचे निराकरण करण्यासाठी, दिनांक 11.11.2021 रोजी माननीय आमदार बाळाराम पाटील, श्री म्हसोबा सोसायटीचे सदस्य, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री काशिनाथ चव्हाण आणि कंपनीचे अधिकारी यांची एकत्रित सभा झाली. या सभेमध्ये श्री म्हसोबा सोसायटीला प्रकल्पात इमारत साहित्य आवश्यकतेनुसार पुरवठा करणे बाबत उदा. वाळू, विटा, डबर आणि यंत्रसामग्री इत्यादी पुरवठा करण्याचे आदेश कंत्राटदारांनां दिले जातील असे ठरण्यात आले. त्याचप्रमाणे श्री म्हसोबा सोसायटीला आरएमसी आणि मुरुम पुरवठ्याचे देखील कंत्राट झालेल्या सहमती पत्राला अनुसरून मिळेल यावर निर्णय घेण्यात आला.
व्यवस्थापनाने सोसायटीला नेहमीच सहकार्य केले असून, सोसायटीकडूनही अश्याच प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे. सदरील प्रसिद्ध झालेल्या चुकीच्या बातम्यांमुळे व अपूर्ण माहितीमुळे कंपनी बाबत चर्चा न झालेल्या विषयांवर अफवा पसरविल्या जात असून हे झालेल्या सहमती पत्राला व चर्चेला अनुसरून नाही असे कंपनी व्यवस्थापन स्पष्ट करत आहे.
सोसाटीने असेही मान्य केले आहे की, प्रकल्पाला लागू असलेले सुरक्षा नियम आणि इमारत साहित्य पुरवणे बाबत असलेले गुणवत्ता निकष बाबत सर्व बाबींचे पालन केले जाईल. त्याचप्रमाणे सहमती पत्रानुसार सोसायटीकडून अथवा शेतकऱ्यांकडून प्रकल्पा विरोधात दाखल केलेल्या खोट्या व चुकीच्या तक्रारी मागे घेण्याचे सोसायटीकडून मान्य करण्यात आले आहे.
सदरील प्रकल्प उभा करण्यासाठी तोंडरे गावातील शेतकऱ्यांकडून सध्याच्या बाजारभावापेक्षा जास्त किंमतीने जमीन खरेदी करून MIDC कडे वर्ग केली आहे. कंपनी व्यवस्थापनाने प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त केल्या आहेत. कंपंनी व्यवस्थापन स्थानिक लोकांना ठेकेदारांना इमारत साहित्य पुरवठा करण्यासाठी सर्व ते सहकार्य करीत आहे.
सदरील वृत्तामधील तोंडरे गावचा रस्ता अतिक्रमित केले बाबतची माहिती असत्य व निराधार आहे. या बातमीमुळे गैरसमज पसरविले जाऊ शकतात म्हणून व्यवस्थापन याबाबत स्पष्टीकरण देत आहे. सदरील अमोनिया प्रकल्प हा उच्च तांत्रिक प्रणालीचा व पर्यावरणाशी निगडित सर्व उत्तम प्रतिच्या टेकनॉलॉजि असणारा आहे. या प्रकल्पामुळे तळोजा परिसरातील वाहनांची वाहतूक कमी होऊन प्रदूषण कमी होण्यास खूप मदत होणार आहे.
हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्याने येथील सुषिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे राज्याच्या व देशाच्या सामूहिक व आर्थिक हिताच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पामुळे देशाची जवळपास २५००० कोटी रुपयाची अमोनियाचे आयात वाचणार असून पुढील १० वर्षात या प्रकल्पामुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून देशाच्या आर्थिक व्यवस्थेला मदत होणार आहे. अशाप्रकारच्या चांगल्या प्रकल्पांना अडथळे निर्माण करुन राज्याच्या आणि देश्याच्या हिताला बाधा निर्माण होत आहे.
पीसीएल प्रकल्प व्यवस्थापन स्थानिक नागरिकांच्या हक्कांसाठी त्याच्यासोबत नेहमी उभे असेल. म्हणून कंपनी व्यवस्थापन राष्ट्र हिताच्या दृष्टीने या नियोजित प्रकल्पाला सर्वांनी सहकार्य करावे असे विनम्र अवाहन करीत आहे.







Be First to Comment