पनवेलमध्ये कडक लाॅकडाऊन : भाजी मार्केट, किराणा दुकानेही बंद !
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
पनवेल तालुक्यात कोरोना ने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पनवेल महानगरपालिकेने कडक निर्बंध घातले आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या लॉक डाऊन ची खिल्ली खुद्द उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी आपल्या स्टाईलमध्ये उडविल्याची व्हाईस क्लीप सर्वत्र व्हायरल झाली. त्यानंतर आता महानगरपालिकेने शहरातील दुकानदारांवर निर्बंध लादले. महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी आज काढलेल्या आदेशानुसार महानगर पालिका हद्दीतील भाजी मार्केट तसेच किराणा मालाची दुकाने देखील बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
जाणून घेऊया काय आहेत हे आदेश कोणावर कसे आहेत निर्बंध
“संपुर्ण पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक ०६ जुलै, २०२० रोजी सायंकाळी ०५.०० वाजलेपासून ते दिनांक १४ जुलै, २०२० रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दुकानांवर पुढीलप्रमाणे निबंध लादत आहे
👉 अन्नधान्य, भाजीपाला, अंडी, फळे, बेकरी, दुध, मासळी, चिकण मटन व इतर जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा (फक्त Home Delivery) उपरोक्त काळात दररोज सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यंत सुरू राहतील केवळ घरपोच सेवा देता येईल. कोणत्याही प्रकारे या काळात काऊंटर सेल करता येणार नाही.
👉 दुध, डेअरी आस्थापना सकाळी ०५.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत सुरू राहतील.
👉 औषधांची दुकाने (फक्त औषधे विकण्याची मुभा असेल)
a) दररोज औषधाची दुकाने सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यंत भौतिक अंतराचे (Physical Distancing) पालन करून सुरू राहतील.
b) रूग्णालयातील (ज्या ठिकाणी आंतररूग्ण विभाग सुरू आहे अशा ठिकाणी) औषधाची दुकाने २४ तास किंवा त्यांच्या सोयीनुसार सुरू ठेवण्याची मुभा असेल.
c) २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी असणाऱ्या औषधी दुकानांना २४ तास सुरू ठेवण्याची मुभा असेल.
👉 पिठाची गिरणी दररोज सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
👉 रेस्टॉरंट व किचन (फक्त Home Delivery) दररोज सकाळी १०.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत Take away / Parcel करीता सुरु राहतील.
वर नमूद केलेप्रमाणे Home Delivery करताना Home Delivery करणारे व्यक्तींचे स्वयं घोषणापत्र / प्राधिकृत पत्र / ओळखपत्र संबंधित दुकानदार यांनी करावे. त्याचप्रमाणे अशासकीय सामाजिक संस्था (NGO) / स्वंयसेवक (Volunteers) यांची मदत घेत असेल तर, त्यांचे स्वयं घोषणा पत्र बाळगावे. सदर ओळखपत्र / प्राधिकृत पत्र / स्वंय घोषणापत्र खोटे आढळल्यास अथवा त्याचा गैरवापर केल्यास संबंधिताविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
कोव्हिड-१९ संदर्भात राष्ट्रीय निर्देश तंतोतंत खालीलप्रमाणे लागू
१) सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी तसेच प्रवासाच्या दरम्यान मास्कचा वापर अनिवार्य, मास्क न लावणारे व्यक्तीविरूध्द रक्कम रू.१००/- दंड लावण्यात येत आहे.
२) सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकमेकांमध्ये किमान ३ फूट अंतर ठेवण्यात यावे. सार ठेवल्यास व्यक्तिला रू.२००/- दंड व दुकानदाराला रू.१,०००/- दंड आकारण्यात येईल.
३) लग्नविषयक कार्यक्रम ५० व्यक्तींच्या संख्येच्या मर्यादित आयोजित करण्यास मुभा असेल, अत्यविधीला ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही.
४) सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, धुम्रपान व मद्य इत्यादीबाबत प्रतिबंधात्मक आदेश कायम राहतील.
५) शक्यतो Work From Home कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा.
६) सार्वजनिक ठिकाणी आत येणे व बाहेर जाणे या ठिकाणो हॅण्ड सॅनिटायझर व थर्मल स्कॅनिंगचा वापर करावा.
७) कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक सुविधेच्या ठिकाणी जेथे मानवी संपर्क होतो. उदा. दरवाजाचे हॅण्ड इत्यादी ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात यावे,
८) कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना भौतिक अंतराचे (Physical Disatancing) ठेवावे.
९) सार्वजनिक स्वरुपाचे कंस्ट्रक्शन साईट ज्या यापुर्वी अनुज्ञेय करण्यात आल्या आहेत व सुरु आहेत त्या तशाच सुरु राहतील. पावसाळ्यापुर्वीची कामे जी यापुर्वी अनुज्ञेय करण्यात आलेली आहेत (खाजगी व सार्वजनिक) ती तशीच सुरु राहतील.
१०) Online Distance Learning आणि अनुषंगिक Activities या पुर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
११) खाजगी कार्यालये उदा. कॉलसेंटर त्यांच्या एकूण कर्मचारी संख्येच्या १० टक्के क्षमतेने किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असतील तेवढ्याच संख्येने कार्यरत राहतील.
१२) सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यावसायिक आस्थापना आणि दुकानदार मालक, व्यक्ती यांच्यावर उपरोक्त अधिसुचनेनुसार महाराष्ट्र कोव्हिड-१९ उपाययोगना नियम २०२० चे नियम ११ नुसार, भारतीय दंडसंहिता (४५०॥ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल
१३) सर्व नागरिकांनी जाहिर आवाहन करण्यात येते को, उपरोक्त काळात नागरिकांनी “जनता कर्फ्य” पाळून महानगरपालिकेस सहकार्य करावे हि विनंती.
Be First to Comment