Press "Enter" to skip to content

पालखी निघाली धाकटी पंढरीला

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने भाताण गावातून दिंडीचे प्रस्थान

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

वारकऱ्यांच्या मुखातून होणारा ग्यानबा तुकाराम आणि विठू नामाचा गजर टाळ मृदुंगाच्या गजरात खांद्यावर भगव्या पताका घेऊन साजगाव खोपोली येथील धाकटीपंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या साजगाव येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात दर्शनासाठी भाताण गावातून कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचे प्रस्थान झाले.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले आणि भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष भोईर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून सदर दिंडीची सुरुवात करण्यात आली. गेली आठ वर्षाची परंपरा कायम ठेवत ह.भ.प. कीर्तनकार, शिवचरित्रकार संतोष महाराज सते यांच्या सहकार्याने दरवर्षी या दिंडीचे आयोजन केले जाते. मात्र दोन वर्ष कोरोना संसर्गांने डोके वर काढले असताना वारकऱ्यांना आपल्या लाडक्या भगवंताचे विठू माऊलीचे दर्शन घेता आले नाही.यावर्षी मात्र विठुरायाचे दर्शन व्हावे म्हणून सर्व वारकरी महिलावर्ग डोक्यावर तुळस घेऊन तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषत वैष्णव परंपरेत महत्त्वाची मानली जाते वारकरी संप्रदयात तुळसीची माळ आणि तुळशी वृंदावन याच खुपच महत्व आहे असे तुळशीवृंदावन डोक्यावर घेऊन महिलावर्ग लहान मुले पताका खांद्यावर घेऊन टाळ-मृदुंग विठ्ठलाच्या गजरात ही दिंडी भाताण येथून प्रस्थान झाली.

धाकटी पंढरीची वारी केली तरी पंढरीच्या विठुरायाचे दर्शन झाल्यासारखे समाधान वाटते. अशीच सेवा आमच्या गावातून घडावी प्रत्येक वेळेस आम्ही आपल्या सोबत आहोतच तसेच आंबेकर महाराजांची कृपा आहे म्हणून आपला परिसर परमार्थात आहे म्हणून तरुण वर्ग कुठेही भरकटत न जाता सत्कर्माची आस धरावी असे म्हणून वसंत काठावले यांनी शुभेच्छा दिल्या तर आठ वर्षाची परंपरा संतोष महाराज यांनी कायम सुरू ठेवली अतिशय लहान वयात आपण हे कार्य सुरू केले याचा मला अभिमान वाटतो परमार्थाची ओढ काय असते ती विठुरायाच्या दर्शनाने कळते आणि आपोआप आपले पाय वारिकडे वळले जातात असे नगरसेवक बबन मुकादम म्हणाले.

यावेळी पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले, नगरसेवक बबन भाई मुकादम, भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष भोइर, युवा नेते अनिल काठावले, ग्रामपंचायतीचे सदस्य तानाजी पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील सते, ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश जूमारे,हभप अनंत महाराज पाटील, संजय काठवले, सुनील सोनटक्के, सुनील पाटील भिंगार, समाज सेवक कृष्णा भोईर, कमलाकर भोईर, तसेच विभागातील वारकरी संप्रदायातील महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येने सदर दिंडीमध्ये सहभागी झाले होते.यावेळी विठुनामाने परिसर दुमदुमून गेला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.