Press "Enter" to skip to content

कार्तिक पौर्णिमेची यात्रा रद्द

डोलकाठीच्या तुऱ्या वर बांधण्यासाठीचा गरुड ध्वज ढाक डोंगरावरून आणला, यात्रा रद्द, दर्शन मिळणार

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

देऊळवाडी किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला ढाक डोंगरावरील चढण्या – उतरण्यास अत्यंत कठीण असलेल्या भैरी मंदिरातून गरुड ध्वज आणला मात्र यंदाही कोरोनाच्या संकटामुळे कार्तिक पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली असून भाविकांना सर्व शासकीय नियम पाळून दर्शन घेता येणार आहे.

सकाळी गरुड ध्वजाची पूजा जेष्ठ वारकरी नारायण बडेकर यांच्या हस्ते मंदिरात करण्यात आली. त्यानंतर श्री ग्रामदेवी बहिरी तळई संस्थान, देऊळवाडी किरवली चे सचिव दिलीप बडेकर, दिव्यांग जनार्दन पानमंद, अनिल खंडागळे, नितीन बेडकर अरविंद बडेकर, बिपिन बडेकर,विवेक पाटील, राजेश बडेकर, रवी बडेकर, जनार्दन बडेकर, केतन बडेकर, संदीप बडेकर, सुनील अहिर, सुमित गायकर, सनी गायकर, किरण गायकवाड, नयन बडेकर आदी ग्रामस्थ गरुड ध्वज आणण्यासाठी ढाक डोंगरावर गेले होते.

तो गरुडध्वज ढाक भैरी मंदिरात आणल्या नंतर गरुड ध्वजाची पूजा दिलीप बडेकर यांच्या हस्ते करून अभिषेक करण्यात आला त्यानंतर हे सारे भाविक भक्त मार्गस्थ झाले. हा गरुड ध्वज देऊळ वाडी येथे आणण्यात आला. हा ध्वज ढोलकाठीच्या तुऱ्यावर बांधण्यात येणार आहे. त्यांनतर गुरूवारी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता ही डोलकाठी मंदिराजवळ उभी करण्यात येणार आहे. शुक्रवारी 19 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला या डोलकाठीचा मोर पिसाऱ्याने शिवमंदिरातील शिवपिंडीला आरतीच्या वेळी वारा घालून ही तीस फुट उंचीची डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर व हातावर ठेऊन नाचविण्यात येते. हे दृश्य फारच रोमांचकारक असते. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने परंपरागत असलेली यात्रा रद्द करण्यात आली असून केवळ हार – फुलांची दुकाने असणार आहेत. भाविकांना शासकीय नियम पाळून दर्शन देण्यात येणार आहे.

‘यंदाही कोरोनाच्या संकटामुळे यात्रा रद्द केली आहे. हार – फुलां व्यतिरिक्त कोणत्याच प्रकारची दुकाने लावण्यात येणार नाहीत. मात्र दर्शनासाठी मंदिर खुले राहील. सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार असून भाविकांसाठी मास्क अनिवार्य असणार आहे. सुरक्षित अंतर ठेवूनच दर्शन दिले जाणार आहे. भाविकांनी सहकार्य करावे.’

—– दिलीप बडेकर, सचिव, श्री ग्रामदेवी बहिरी तळई संस्थान

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.