Press "Enter" to skip to content

एस जी टी इंटरनॅशनल स्कुलचे उद्घाटन

एस जी टी इंटरनॅशनल स्कुलचे उद्घाटन

शिक्षण हेच जीवन आहे : केंद्रीय राज्यमंत्री ए नारायण स्वामी यांचे प्रतिपादन

सिटी बेल | पनवेल |

शिक्षण हेच जीवन आहे, प्राप्त केलेली डिग्री हा केवळ एक कागदाचा तुकडा आहे, विद्यार्थ्यांनी त्यांचा बुध्यांक वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे, रोजगारक्षम शिक्षण घेणे ही काळाची गरज बनली आहे.असे विचार भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए नारायण स्वामी यांनी मांडले.ते एस जी टी इंटरनॅशनल स्कुल च्या उदघाटन समयी बोलत होते.आमदार प्रशांत ठाकूर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

रमेश गुलाब तुपे यांच्या माध्यमातून एस जी टी इंटरनॅशनल स्कुल ची निर्मिती करण्यात आली आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या 3 शाळा रविवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सुरु करण्यात आल्या.या शाळांचे उद्घाटन केंद्रीयमंत्री नारायण स्वामी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.सचिन आवळे यांनी उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक सादर केले.चेअरमन रमेश तुपे आपल्या मनोगतात म्हणाले की या शाळेची पायाभरणी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते झाली आहे.त्यांच्याच मार्गदर्शनाने मी एक विकसक असून देखील शिक्षण क्षेत्रात पदार्पण करत आहे.व्यस्त कार्यक्रमांतून केंद्रीय मंत्री नारायण स्वामी यांनी उद्घाटनासाठी उपस्थिती दर्शविली याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
नारायण स्वामी आपल्या मनोगतात म्हणाले की यंदाचे वर्ष हे लहुजी साळवे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे.लढवय्या विचारांच्या साळवे यांच्या सारख्यांच्या योगदानामुळेच आपण ब्रिटिश सरकारला हाकलून लावू शकलो.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या क्रांतिकारी विचारांचा नेत्यांचा आणी लहुजी साळवे यांच्या सारख्या लढवय्या विचारांच्या नेत्यांचा रमेश तुपे यांच्यावर प्रभाव आहे.तुपे यांनी स्वतः दिल्लीला येऊन मला आमंत्रण दिले व कार्यक्रमाला आलेच पाहिजे असा आग्रह धरला.त्यांचा आग्रह हा आदेश समजून मी येथे आलो आहे.तुपे यांनी आपल्या शाळेत प्रवेश देताना विद्यार्थी किंवा पालक यांचे इंटरव्यू घेणार नाही अशी पॉलिसी बनविली आहे, त्याबद्दल त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री ए. नारायण स्वामी,आमदार प्रशांत ठाकूर,भाजपाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत,सुनील वारे,पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी,भाजपाचे कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, नगरसेवक विजय चिपळेकर, मराठा समन्वय समितीचे निमंत्रक विनोद साबळे, नगरसेविका अरुणाताई भगत, नगरसेविका कुसुमताई म्हात्रे, नगरसेविका संतोषी तुपे, नगरसेवक गोपीनाथ भगत, हॅप्पी सिंग, विद्या बानकोडे, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, शशिकांत भगत आदी मान्यवरांच्या समवेत विद्यार्थी, पालक व कामोठे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लहुजी वस्ताद साळवे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. रमेश तुपे हे त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मार्गक्रमण करत असतात.आपल्या समाजातील तरुणांचे कौतुक करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण स्वामी या ठिकाणी आवर्जून आले त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश झपाट्याने बदलतोय.आपल्या देशात सकारात्मक बदल अत्यंत वेगाने होत आहेत.नुकतेच झालेले पद्म पुरस्कार हे त्याचे द्योतक म्हणावे लागेल.योग्य व्यक्तींना योग्य पुरस्कार देणे हा पायंडा मोदीजींनी या देशात घालून दिला आहे.व्यवसायाने विकासक असणाऱ्या रमेश तुपे यांनी शिक्षण क्षेत्रात पदार्पण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. – आमदार प्रशांत ठाकूर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.