कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे येथे सामाजिक संस्थांचा स्तुत्य उपक्रम
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
सदगुरु सेवा प्रतिष्ठान, पुणे आणि धैर्य सामाजिक संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूर तालुक्यातील कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे येथे विद्यार्थ्यांसाठी शाळा तेथे ग्रंथालय या उपक्रमांतर्गत 121 अवांतर वाचन पुस्तके वाटप करण्यात आली.
यावेळी विद्यार्थिनींसाठी उपयुक्त असे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. सदगुरू सेवा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष सचिन म्हसे यांनी पोलादपूर या अतिदुर्गन तालुक्यातील विद्यार्थ्यांकरीता उपयुक्त अशा वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी तालुक्यात सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असलेल्या धैर्य सामाजिक संस्थेची निवड केली आहे. धैर्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ही मदती सचिन म्हसे तालुक्यातील विद्यार्थ्यांस सातत्याने पोहोचवीत आहेत.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक संस्था सवाद धारवली संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष बापूराव बांदल, मुख्याध्यापक सुनील शिंदे, वरीष्ठ शिक्षक ढाणे, कलाशिक्षक संतोष सुतार. श्रीमती मावळी, श्रीमती जाधव, पोलादपूर तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विद्याधर कोळसकर उपस्थित होते. तसेच धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर, व्यवस्थापक अमोल उतेकर, मदतनीस सुजल जळवी उपस्थित होते. या क्षणी अध्यक्ष ओंकार उतेकर यांनी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनची माहिती देत मशीन चालविण्याचा डेमो विद्यार्थिनी आणि शिक्षिकांना दिला.








Be First to Comment