मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या कडून चिंबुळकर कुटुंबाचे कौतुक
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन खालापूर तालुका मनसे महिला आघाडी अध्यक्षा हेमलता प्रभाकर चिंबुळकर यांनी भेट घेतली.यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हेमलता चिंबुलकर यांनी डाॅक्टरेट मिळविल्याबद्दल त्यांच्या प्रशस्तिपत्राची पाहणी करून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच तालुक्यात बहुउद्देशीय संस्थेचे काम पाहणा-या कल्पना प्रभाकर चिंबुळकर यांच्या संस्थेच्या नोंदणीप्रमाणपत्राचे उद्घाटनही राज ठाकरे यांनी त्यांच्या हस्ते केले.यावेळी विविध थरांतील मान्यवर उपस्थित होते.
डाॅक्टर हेमलता चिंबुलकर ह्या महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.महिलांवरील अत्याचाराविरोधात लढणा-या लढवय्या म्हणून त्यांची खालापूर तालुक्यात ओळख आहे.त्यांच्या कार्याचे कौतुक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.








Be First to Comment