Press "Enter" to skip to content

आदिवासींना दाखल्यांचे वाटप

उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील आदिवासींना विविध दाखल्यांचे वाटप

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उपविभागीय अधिकारी राहुल मूंडके, तहसीलदार उरण भाऊसाहेब अंधारे , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण- अहेर राव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील 1118 जातीचे दाखले, 600 नवीन रेशन कार्ड, 700 रेशन कार्ड अद्ययावत करणे, 1000 आधार कार्ड, 1000 बँक पास बुक , 200 मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आली.25 महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगून त्यांना सदर शस्त्रक्रिया करण्या साठी मदत केली.

अशा अनेक प्रकारे आदिवासी बांधवांचे आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी गेली दोन वर्षापासून मेहनत घेण्यात आली. संदीप म्हात्रे यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने पूणाडे आदिवासी वाडी वरील सर्व लहान मुलांना चॉकलेट वाटण्यात आली . तसेच उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांच्या हस्ते वाडी वरील सर्वांना जातीचे दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

दिनांक 03/11/2021 रोजी चिरनेर येथील केल्याचा माळ येथे आणि दिनांक 02/11/2021 रोजी मांगिर देव भवरा उरण येथे जातीचे दाखले वाटप करण्यात आले . पुढील काही दिवसात उरण तालुक्यातील सर्व वाड्यावर तयार झालेल्या जातीचे दाखल्यांचे वाटप होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील राहिलेल्या आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले तयार करण्यासाठी कॅम्प घेवून दाखले लवकरात लवकर दाखले काढायचे आहेत आणि त्याच बरोबर पनवेल तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना जातीचे दाखले काढण्यासाठी दिनांक 15/11/2021 पासून कॅम्प सुरू करायचे आहे असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले .

सदर जातीचे वाटप करताना सामाजिक कार्यकर्ते तथा उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार , संदीप म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर आणि प्रा. राजेंद्र मढवी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.