पोलादपूर तालुक्यातील शासकीय कोविड योध्द्यांचा गौरव आघाडी सरकारचे कर्तव्य -आ.भरत गोगावले
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)
तालुक्यातील जनतेच्या अनेक गैरसोयींना सामोरे जात कोरोना संसर्गाच्या काळात योग्य ती खबरदारी घेणाऱ्या पोलादपूर तालुक्यातील शासकीय कोविड योध्द्यांचा गौरव करणे हे राज्यातील आघाडी सरकारचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्मानचिन्ह प्रदान करण्यामागे अधिक जबाबदारीने जनतेची सेवा व्हावी, हा उद्देश्य असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले. बॅ.नाथ पै सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभावेळी ते बोलत होते.
पोलादपूर पंचायत समितीच्या बॅ.नाथ पै सभागृहामध्ये व्यासपिठावर आ.गोगावले यांच्यासमवेत उपसभापती शैलेश सलागरे,पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, नगराध्यक्ष राजन पवार, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार, सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे, महाड देशमुख कांबळेतील शैलेंद्र देशमुख, नडगांवचे राजेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, आयुषचे डॉ.राजेश शिंदे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे यांना सन्मानचिन्ह देण्यात आली. याखेरिज, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गुलाबराव सोनावणे, पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई, नायब तहसिलदार समीर देसाई, गटविकास अधिकारी डॉ.भूषण देसाई यांची सन्मानचिन्हे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या प्रतिनिधींनी स्विकारली.
याप्रसंगी नगरसेवक प्रसन्न बुटाला, माजी नगराध्यक्ष नागेश पवार, उपशहरप्रमुख राजन पाटणकर, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, पोलीस कर्मचारी, शिवसेना व युवासेना पदाधिकारी तसेच पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.






Be First to Comment