Press "Enter" to skip to content

शिवरत्न सेवा संघाने करून दाखवलं !

सहाव्या रक्तदान शिबीरास ११० रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद ; रक्त संकलन पिशव्यांच्या कमतरतेमुळे अनेकजण रक्तदानापासून वंचित

सिटी बेल लाइव्ह / कांजुरमार्ग / पंकजकुमार पाटील #

शिवसेना पुरस्कृत शिवरत्न सेवा संघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार सुनील राऊत यांच्या वाढदिवसानिमीत्त कांजुरमार्ग येथील सेंट फ्रांन्सिस झेविअर्स हायस्कूल मध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सदर शिबीरास कांजुरच्या नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन अवघ्या तीन तासांत ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले. एकट्या कांजुर विभागात या आधी गेल्या दोन महिन्यांत पाच रक्तदान शिबीरे पार पडली होती त्यामुळे या शिबीरास अल्पसा प्रतिसाद मिळेल असा अंदाज अनेकांकडून वर्तवला जात होता. त्यामुळे कांजुर – भांडुपकरांचे लक्ष यावर लागून राहिले होते. पण शिवरत्नच्या शिलेदारांनी हे आव्हान स्विकारले. अपार मेहनत घेऊन सर्वांचे अंदाज मोडून काढीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. रक्तदात्यांना कोणतेही आमिष न दाखवता ह्या रक्तदान शिबीरास एवढा मोठा प्रतिसाद होता की रक्त पिशव्यांच्या कमतरतेमुळे (shortage of blood bags) ५० ते ६० रक्तदात्यांना इच्छा असूनही रक्तदान करता आले नाही. त्यामुळे अखेर मंडळाला हे शिबीर आटोपते घ्यावे लागले. कांजुरच्या नागरिकांनी कोरोना सारख्या महामारीला न घाबरता मोठ्या धाडसाने रक्तदान शिबीरात भाग घेतला त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

सदर शिबीराचे आयोजन माजी उपविभाग प्रमुख सुधाकर पेडणेकर व माजी शाखाप्रमुख महेश पाताडे यांनी केले होते तसेच व्यवस्थापकीय व विशेष कामगिरी संदेश उपरकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिषेक टेमकर, जीवन देसाई व इतर कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली.

या शिबीरास विभागप्रमुख रमेश कोरगांवकर, आमदार सुनिल राऊत, नगरसेविका सौ.सुवर्णा करंजे, नगरसेवक उपेंन्द्र सावंत तसेच शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व इतर सन्माननिय व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवरत्न सेवा संघाने केलेल्या ह्या उत्तम कामगिरी बद्दल येथील नागरिकांमध्ये त्यांच्या कौतुकाची चर्चा रंगत आहे. शिवसेनेच्या स्टाईल मध्ये सांगायचं झालं तर शिवरत्नने करून दाखवलं !

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.