सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
रोहे तालुक्यातील महादेववाडी प्रा.शाळेस रोठ बु.शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख निलेश वारंगे यांनी रू.दहा हजाराची आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले आहे.
३ जून रोजीच्या नैसर्गिक चक्रीवादळाने महादेववाडी शाळेचे सिमेंट पत्रे उडाल्याने शाळेचे फार मोठे नुकसान झाले.अशा परिस्थितीत शाखा प्रमुख निलेश वारंगे यांनी आपला २६ जुलै रोजीचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले. त्याचाच एक भाग म्हणून महादेववाडी शाळेस त्यांनी दहा हजार चेक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच येथील मुख्याध्यापक व शिक्षकव्रुंद यांच्या हाती देऊन शाळेच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी आर्थिक सहकार्य केले आहे.
यावेळी धाटाव विभाग प्रमुख नितीन वारंगे, सागर भगत, रुपेश साळुंखे, राजेश भगत, सागर भगत, अक्षय देशमुख, सतीश वारंगे, समीर वारंगे, किरण भगत, श्रीकांत जंगम, महेश खांडेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.






Be First to Comment