बाधित रुग्णांची संख्या पोहोचली ५१३ वर
सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार )
रोहे तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस ५१३ अधिक वाढू लागला असून,आज नव्याने १८ रुग्ण पाँझिटिव्ह सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्ण संख्या ही ५१३ वर पोहोचली आहे.
रोहे तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाने अक्षरक्ष: थैमान घातले आहे.त्यात रोज नवीन रूग्ण सापडू लागल्याने नागरिकांचे टेन्शन वाढू लागले आहे.
आज तालुका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार रोहे तालुक्यात आज नव्याने १८ रूग्ण सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्णसंख्या ५१३ वर पोहोचली आहे.सध्या १४३ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत तालुक्यात १२ जण मयत झाले आहेत.तर-३५८ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे.
रोहे तालुक्यात कोरोना रूग्णांचा आलेख हा चढताच राहिला असून वाढत्या प्रादुर्भावामुळे तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही भितीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तर वाढती रूग्ण संख्या पाहता मध्यंतरी पुकारण्यात आलेल्या लाँकडाऊनची मात्राही
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर लागू पडली नसल्याचे दिसत आहे.कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच राहा सुरक्षित रहा व आपल्याबरोबर आपल्या परिवाराचेही संरक्षण करा असे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.






Be First to Comment