सिटी बेल | कळंबोली | प्रतिनिधी |
कामगार नेते श्याम म्हात्रे यांचा संघर्ष हा स्थायीभाव असून यशापयशाची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. त्यांचे जीवनच संघर्ष करण्यात गेले. ते कधीही स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी समाज जोडला आहे. त्यामूळे जनता त्यांची सतत आदरनिय ञुणी राहील असे प्रतिपादन रायगड उत्तर जिल्हा अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त ते महात्मा फुले सभागृह ( आगारी समाज सभागृह) मध्ये बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले श्याम म्हात्रे यांचे कामगार क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी अपयशाची कधीही पर्वा केली नाही त्यामुळे कामगारागांचे भविष्य घडविताना सातत्याने संघर्षच केला आहे.यावेळी कामगार नेते दिनेश पाटील यांनी सांगितले श्याम म्हात्रे त्यांच्यातील गुण घेवून आम्ही कामगार क्षेत्रात यशस्वी झालो. त्यांचे जीवनच संघर्षमय होते. लोकनेते दि बा पाटील यांच्या समवेत त्यांनी अनेक लढे यशस्वी केले आहेत. श्याम म्हात्रे यांचा वारसा चालवायचा असेल पनवेल उरणमध्ये त्यांच्या जयंत्या साजरा करणे आवश्यक आहे. भिष्माचार्याच्या चरणावर डोके ठेवावे. त्याप्रमाणे श्याम म्हात्रे यांच्या सारख्या योद्धाला नमन करावेच लागेल.
यावेळी उपस्थितीतांचे आभार मानताना कोकण श्रमिक संघटनेचेया श्रुती म्हात्रे यांनी सांगितले त्यांच्या कार्यामुळे ते मनोमन जनतेच्या मनात बसले आहेत जनकल्याण हेच ध्येय उरासी बाळगून त्यांनी जनतेची सेवा केली आहे. तेव्हा मी तुमची बहिण समजून मला सल्ला द्या मला समजून घ्या असे आवाहन त्यांनी उपस्थित मान्यवराना केले. यावेळी मार्ग सुखाचा या विषयावर श्री संजीवन म्हात्रे यांचे व्याखान आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी हींद जमदूर सभा संघटनेचे अँड संजय वढावकर, वैजनाथ ठाकूर संजीव म्हात्रे, जे डी तंडा, निर्माला म्हात्रे, शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे, पंकज भगत, एकनाथ ठोंबरे आदीसह मोठ्या प्रमाणात कामगार उपस्थित होते यावेळी कोरोना काळात ज्या कामगारानी जनतेची सेवा केली त्यांना गौरविण्यात आले.








Be First to Comment