मुंबई-गोवा महामार्ग एनएच-६६ च्या पनवेल-इंदापूर विभागाच्या चौपदरीकरण कामाला मिळणार गती
सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांची खासदार सुनिल तटकरे यांनी भेट घेतली व मुंबई गोवा महामार्ग महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यामुळे महाराष्ट्र हायस्पीड कनेक्टिव्हिटीने व्यापले जाईल ज्याचा अनेक क्षेत्रांना फायदा होईल व अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
यावेळी मुंबई-गोवा महामार्ग एनएच-६६ च्या पनवेल-इंदापूर विभागाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतल्याबद्दल त्यांचे तटकरेंनी आभार मानले व उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत व त्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली.

याबरोबरच मुंबई-गोवा एनएच-६६ या मार्गावरील भूसंपादनाच्या समस्येमुळे चौपदरीकरणाच्या कामावर होत असलेल्या परिणामांवर तोडगा काढण्याबाबत, बिरवाडी MIDC जवळ एनएच-६६ साठी अतिरिक्त व्हेंट एरिया प्रदान करण्याबाबत व रायगड रोड राष्ट्रीय महामार्ग एनएच-६६ एफ ला ऐतिहासिक मार्ग बनवण्याबाबत चर्चा केली. एनएच-६६ वरील कशेडी घाटातील एंट्री पॉईंट आणि एक्झिस्ट पॉईंट येथे सुशोभीकरण स्पॉट प्रदान करण्याची व लोटे MIDC जवळील सीएच १९४.६०० आवाशी गुनाडे येथे व्हीयुपी प्रदान करण्याची मागणी केली.










Be First to Comment