सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील धानकान्हे गावचे रहिवासी तथा नाथपंथीय गोसावी समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व वारकरी सांप्रदायाचे निस्सिम भक्त ह.भ.प.काशिराम मालू गोसावी यांना वयाच्या ९० व्या अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली.
ह.भ.प.काशिराम गोसावी हे सुस्वभावी, विनम्र व परोपकारी व्रुत्तीचे होते. तसेच सामाजिक कार्यक्रमात देखील ते नेहमीच सक्रीय असायचे.तसेच खांब विभाग पंचक्रोशीतील संपन्न होणा-या विविध धार्मिक कार्यक्रमप्रसंगी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असे.आपला पारंपरिक शेती व्यवसाय सांभाळून त्यांनी आपला चरितार्थ चालवून कुटुंबातील सर्वांना सुसंस्कारित केले.तर समाजात नेहमीच क मार्गदर्शक म्हणून त्यांचे नाव आवर्जून घेतले जायचे.त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आप्तस्वकीय, मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.
त्यांच्या पश्चात दोनमुलगे, तीन मूली, सुना,जावई,,नातवंडे असा
परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी मंगळ.दि.२८ सप्टें. रोजी तर अंतिम धार्मिकविधी शुक्र. दि.१ आँक्टो.रोजी धानकान्हे येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.







Be First to Comment