सिटी बेल लाइव्ह / रायगड / अमूलकुमार जैन #
समाजात वावरत असताना असे काही कुटुंब आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असल्यामुळे त्यांना धड खाण्यासाठी ही मिळत नाही.त्याचा परिणाम हा त्यांच्या पाल्यावर सुद्धा पडत असतो.आपण जगता जगता दुसऱ्यासाठी जगणे हा जीवनातील वेगळा आनंद आहे. असे प्रतिपादन बोर्ली सरपंच नौशाद दळवी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
यावेळी नौशाददळवी यांनी सांगितले की,जनसेवा ही ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे काहीजण खरोखरच लोकांना सेवेत ईश्वराची भक्ती करीत असतात.अशी कृती माझे मित्र मंडळी करीत आहेत.त्यांनी केलेल्या कार्याला माझा सलाम आहे.गावाने मला घडविले आहे.त्यांच्यामुळे आम्हाला आमची वेगळी ओळख निर्माण करता आली आहे. याचे ऋण फेडावे तितके कमीच आहे.मार्च महिन्यापासून कोरोना चे संकट होते त्यामुळे स्थानिक मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांच्या हातून रोजगार गेला असल्याने त्यांची परिस्थिती ही हलाखीची झाली आहे आणि त्यातच निसर्ग चक्री वादळामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच निवाऱ्याचे नुकसान झाले आहे।त्यामुळे काहीजणांच्या घरात एक वेळ अन्न शिजणे मुश्किल झाले.त्यांना मदत करण्याचे ठरविले.आम्ही केलेली मदत म्हणजे तुटपुंजी आहे.आज जी मदत करण्यात आली आहे त्यामध्ये सर्व समाजातील गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहचविण्याचा प्रामाणिक हेतू आहे.यापुढेसुद्धा आम्हाला जितके शक्य होईल तितकी मदत करू अशी आशाही यावेळी सरपंच दळवी यांनी केली.
यावेळी, अजय सोडेकर,निवृत्त शिक्षक पालवणकर,बोर्ली शाखा प्रमुख भारत मोती,स्वप्नील राम नाखवा,सुचिता सोडेकर, ग्राम पंचायत सदस्य गणेश कट,माजी सरपंच इम्तियाज दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.






Be First to Comment