Press "Enter" to skip to content

जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ.ज्योती म्हात्रे यांचे निधन

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

जनवादी महिला संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा व फुंडे ग्रामपंचायतच्या माजी सरपंच कॉम्रेड ज्योती म्हात्रे यांचे निधन झाले.त्यांच्यावर फुंडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

ज्योतीताई म्हात्रे जनवादी महिला संघटनेच्या स्थापने पासून आज चाळीस वर्षांपूर्वी महिला संघटनेच्या कामाला सुरुवात केली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, पाणी प्रश्न, कामगारांचा लढा,रेशन प्रश्न,हे सर्व प्रश्नांनसाठी महिलांना रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या,आणि महिलांचे अत्याचाराच्या समस्या सोडविण्यासाठी आजही दर शुक्रवारी कामगार भवन ऑफिसमध्ये बसून त्या तक्रार निवारण केंद्र चालवत होत्या. कोर्ट कचेरी न करता समजंशाने कीत्येक महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आजही जनवादी महिला संघटना म्हणून ज्योती म्हात्रे काम करीत होत्या.

ज्योती म्हात्रे जनवादी महिला संघटनेचं काम करत असताना आजही एखादी महिला पोलिस स्टेशन ला जाण्यासाठी आली तर आपलं कोणतंही कारण न सांगता त्या महिले सोबत जात. सरकार दरबारी ज्योती म्हात्रेंची महिला नेत्या म्हणून दबदबा आहे. संघटनेच्या कामाला त्यांनी आपली कौटुंबिक , आर्थिक, शारीरिक अडचणी सांगितल्या नाहीत.अजुनही मशिनवर कपडे शिवण कामाची आवड आहे. खुप अडचणी ना़ तोंड देवून स्वावलंबी जीवन जगत होत्या.

जनवादी महिला संघटना, महिला व सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असलेल्या ज्योतीताई म्हात्रे यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.