सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
धरणासाठी त्याग केलेले घरावर तुळशीपत्र ठेवून विस्थापित झालेले कोयना जांबरुक आताचे वावंढळ गाव आजही पिढ्यानपिढ्या परंपरा जपत असून ग्रामदेवता जानाई देवी गौरी पूजन च्या दिवशी मानकरी असलेल्या कदम कुटुंबात वास्तव्याला जाते.
कोयना धरणाच्या वेळी विस्थापित झालेले हे गाव खालापूर तालुक्यातील वांवढळ गावी पुनर्वसित झाले. पुनर्वसन करताना ग्रामदेवता इंजाई आणि जानाई या गावासोबत वावंढळ येथे आणण्यात आली. भव्य असे मंदिर गावात असून गौरी पुजनाच्या दिवशी ग्रामदैवत जानाई देवी मानकरी कुटुंबात करायचा वस्तीला जाते.
परंपरागत पिढयान पिढया चालत आलेल्या परंपरेनुसार यंदा ग्रामदैवत श्री जानाई देवीचे आगमन राजेंद्र अनंतराव कदम यांच्या निवासस्थानी झाले. दुर्मिळ योग हा वर्षातून एकदाच अनुभवास येत असतो. त्या दिवशी वावंढळ ( कोयना-जांबरूक ) गावचे ग्रामस्थ, माहेरवाशीण, सगेसोयरे, आप्तेष्ट, मित्रमंडळी व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या भक्तिभावाने दर्शनाचा लाभ घेत असतात.
Be First to Comment