सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
गौराईचे आगमन झाल्यावर ग्रामदैवत जानाई व इंजाई यांचे आगमन गौरी पूजनाच्या दिवशी दोन गावचे मानकरी यांच्या घरी होते,ही परंपरा जुन्या सातारा जिल्ह्यातील जांब्रूक गावापासून आजही सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या जांब्रूक गावचे पुनर्वसन रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक वावंढळ गावात कै. जयसिंगराव राजबाराव कदम उर्फ जे आर कदम यांच्या नेतृत्वाखाली सुनियोजित पद्धतीने झाले आहे.कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या अनेक न्याय मागण्या शासन दरबारी पडून आहेत,मात्र ग्रामस्थांनी आपली रूढी-परंपरा,चालीरिती व धार्मिक कार्यक्रम कायस्वरूपी जपून ठेवले.
रायगड जिल्ह्यात येण्यापूर्वी जांब्रूक या गावातच देवी जानाई ही कै.राजबाराव कदम व देवी इंजाई कै. लक्षुमनराव कदम यांच्या घरी गौराई पूजनाच्या दिवशी येत असत,आजही नवीन गावात त्यांच्याच घरी मानाने ग्रामस्थ घेऊन येतात.यावेळी संपूर्ण गाव हजर असतो.दोन्ही घरात गौराई पूजना बरोबर यांचीही पूजा अर्चा होते,देवी जानाई देवी ही गौरी बरोबर स्थानापन्न होते,तर देवी इंजाई ही घरातील कुलदैवतच्या देवहऱ्यात स्थानापन्न होते.रात्रभर भजन गायन करून जागरण केले जाते.
दुसऱ्या दिवशी पुन्हा गावच्या मंदिरात देवींना ग्रामस्थ घेऊन जातात. ही शेकडो वर्षांची परंपरा असल्याचे जुनी जाणती माणसे सांगतात.याही वर्षी ही परंपरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पाळली.सर्व नियमांचे पालन करून गावातील प्रत्येक घरी गौरी-गणपती उत्सव साजरा केला जात आहे.
Be First to Comment