सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
श्रावण महिन्याचे आगमन होतच अनेक सणांची चाहूल लागत असते.शिवाय या महिन्यामध्ये अनेक सण येत असल्यामुळे आबाल,वृद्धा पासून या महिन्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतात.श्रावण महिन्यामध्ये शेवटचा सण म्हणजे पिठोरी अमावस्या हा सण संपूर्ण कोकणामध्ये भक्ती भावाने साजरा करण्यात आला.पिठोरी अमावस्या म्हणजे पिठाचे पदार्थ पदार्थ समवेत रान भाज्या पाले भाज्यांचा समावेश असतो म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात.
सायंकाळी भिंतीवरती शंकराचा कणा काढून रानातील फुले आणून तसेच तांदळाच्या पीठाचे दिवे ,भंडार करून त्याची पूजा करण्यात आली.आणि सायंकाळी हर-हर महादेवाच्या गजरात आणी नदिची वाळू या देवाला वाहून या पिठोरी अमावस्याची सांगता करण्यात आली.
महादेवाचा प्रसाद म्हणून केळीच्या पानामध्ये प्रसाद म्हणजे पंचपक्वान दिला जात असल्यामुळे या पंचपक्वानांचा खमंग मुळे संपूर्ण गावामध्ये यांचा सुगंध दरवळत असतो.अशा पद्धतीने खालापुर तालुक्यातील ग्रामीण भागात हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
Be First to Comment