Press "Enter" to skip to content

वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम, भारतातील २१ राज्यांचे राज्यवृक्षांचे रोपण

सिटी बेल | उलवे | मनोज पाटील |

उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबिवले. त्यापैकी भारतातील एकुण राज्यापैकी २१ राज्यांचे राज्यवृक्ष उरण तालुक्यातील चिरनेर परिसर येथील चांदायले वाडी ( केळ्याचा माळ ) राजिप शालेय परिसरात लावण्यात आली.

अशी वृक्षलागवडीची संकल्पना प्रथमच उरण- पनवेल तसेच नवी मुंबई परीसरात होत आहे ह्याबद्दल किरण मढवी यांचे विशेष कौतुक यावेळी वन्यजीव निसर्ग संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांनी यावेळी केले.

महत्वाचे म्हणजे किरण मढवी यांनी यावेळी केक ऐवजी पपई हे फळ कापून वाढदिवस साजरा केला. तसेच मुलांना फळ वाटप करुन फळाच्या बींया तिथेच माती शेणखतात शाळेय शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमार्फत रुजविल्या.

वाढदिवसानिमित्त वटवृक्ष सामाजिक संस्थेमार्फत रानसई वाडीतील गरीब व गरजू अशा ४८ विद्यार्थ्यांना स्पोर्टस् गणवेश वाटप केले, त्याचप्रमाणे राजीप शाळा चांदायले ( केळ्याचा माळ ) येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व तेथील आदिवासी बांधवांना ताड वृक्षाच्या १००० बीज वाटप करुन वाढदिवस संपन्न झाला.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून चिरनेर ग्रामपंचायत सदस्य रमेश फोफेरकर, आदर्श शिक्षक मढवी गुरूजी, वनविभागाचे हरिदास करांडे, हेमंत पाटील, राजेंद्र पवार, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे नंदेश ठाकूर, प्रगतशील शेतकरी प्रशांत पवार, पक्षीमित्र आनंद मढवी, शिक्षक संजय होलकर शिक्षिका जान्हवी कडु, प्रतिभा लहासे आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.