Press "Enter" to skip to content

उलवे येथे दहीहंडी निमित्त श्रीकृष्णाची प्रिय झाडांचे वृक्षारोपण

वटवृक्ष सामाजिक संस्थेचा अभिनव उपक्रम

सिटी बेल | उलवे | मनोज पाटील |

श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकूळ अष्टमी. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला मध्यरात्री मथुरेत भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणुन ह्या तिथीनुसार भारतभर श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा होतो. “कोकणात ह्या दिनी दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. मात्र कोविड मुळे गेल्यावर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील शासनाच्या काही नियमामुळे दहिहंडी उत्सव पहिल्यासाखरा साजरा करता येणार नसल्याने सदर परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेनी प्रथमच जन्माष्टमी आणि गोपाळकाला निमित्त श्रीकृष्णाची प्रिय झाडे म्हणजे कृष्णवड- परिजातक- कदंब- मुचकूंद अशी रोपे लावुन दहिहंडी उत्सव साजरा केला.

भारतीय सण आणि निसर्ग यांचा अतुट नाते आहे. म्हणुनच वटवृक्ष सामाजिक संस्था त्यांच्या अनेक वृक्षारोपन कार्यक्रमात भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड आणि राज्य वृक्ष आंब्याचे रोप आग्रहाने लावत असतात.

दहींहडी निमित्त उलवे सेक्टर २४ येथील श्री. हनुमान मंदिर तलाव परिसरातच कृष्णवड, परिजातक, कदंब आणि मुचकूंद अशी श्रीकृष्णाची प्रिय रोपे आणि संपुर्ण उलवे नोड परिसरात पहिल्यांदाच अशी रोपे लावण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, श्री. गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष संदेश साळूंखे, शिवदास कोळी, सागर ओवाल, अनिल कांबळे, संदिप निले, आदित्य भोसले, त्रृषीकेश चव्हाण, गणेश नागले, नविन गोसाई आदि वृक्षप्रेमी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.