श्री जोगेश्वरी मंदिराच्या प्रांगणात आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांचा ६५ वा वाढदिवस नुकताच रायगड जिल्ह्यात सर्वत्र विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नागोठण्यात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन नागोठणे शहर युवक राष्ट्वादी काँग्रेस तर्फे करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून सुनील तटकरे युवा प्रतिष्टान, नागोठणे यांच्या तर्फे नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदीर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते पार पडला.
सुनील तटकरे प्रतिष्टान तर्फे श्री जोगेश्वरी मंदिर परिसरासह नागोठण्यातील विविध भागांमध्ये १०० वृक्षांचे रोपण आज करण्यात आले. तत्पूर्वी आमदार अनिकेत तटकरे यांनी श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन कोरोना विषाणू महामारीचे हे संकट कायमचे दूर होऊ दे असे साकडे श्री जोगेश्वरी मातेला घातले.
या कार्यक्रमाला नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, राष्ट्वादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुधाकर जवके, कृष्णा धामणे, युवक राष्ट्वादीचे जिल्हा सरचिटणीस विनायक गोळे, पिगोंडेचे सरपंच संतोषभाई कोळी, नागोठणे ग्रामपंचायत सदस्य अतुल काळे, अखलाक पानसरे, दिपेंद्र आवाद, निवास पवार, दिनेश घाग, अमिता शिंदे, राजू शिंदे, नितीन पत्की, अमित जांबेकर, रोशन पारंगे, मनोज टके, धृव सोष्टे, कुणाल तेरडे, मधुकर महाडिक, केतन भोय, उमेर सांगडे, चंद्रकांत देवळे, ओंकार लाड, मंदार चितळे, अभिजित वाळंज नागोठणे विभातील राष्ट्वादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.






Be First to Comment