शेकाप चे माजी सरपंच सुनील म्हात्रे,विभागीय चिटणीस गजानन म्हात्रे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
सिटी बेल | पनवेल |
नाही मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याला विरोध करण्याचे राजकीय परिणाम शिवसेनेसह महा विकास आघाडीच्या घटक पक्षांना देखील भोगावे लागतील हे याआधीच दिसून येत होते या मोहिमेला आता वेग आला असून शेका पक्षाला याचा खूप मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
आज शेतकरी कामगार पक्षातील ओवळे येथील खंदे कार्यकर्ते माजी सरपंच सुनील म्हात्रे विभागीय चिटणीस गजानन म्हात्रे, संतोष म्हात्रे तुकाराम म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला रामराम करून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी या कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी राज्याचे माजी मंत्री भाजपाचे ताकतवर नेते आमदार आशिष शेलार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी,अरूणशेठ भगत, रत्नप्रभा घरत, राजेंद्र पाटील, विनोद साबळे आदी मान्यवर हजर होते.
दि बां चे नाव जर विमानतळाला दिले गेले नाही तर ठाकरे सरकार उखडून टाकू – आमदार आशीष शेलार
दि बा पाटलांचे नाव जर नवी मुंबई विमानतळाला दिले गेले नाही तर उद्धव ठाकरे यांचे सरकार उखडून टाकू. गांधी परीवाराचे नाव चालते मग दि बां च्या नावाचा यांना काय त्रास होतोय ? दि बां च्या नावाला विरोध का आहे हे आधी जाहीर करा. भारतीय जनता पार्टी दि बां च्या नावासाठी एक पाऊल सुध्दा मागे घेणार नाही.आमचे संपुर्ण सर्मथन दि बां च्या नावाला आहे.
विमानतळाच्या कामाचे टेंडर नरिमन पॉईंट येथील निर्मल बिल्डींग मध्ये सहाव्या माळ्यावर दिले जातात. निर्मल बिल्डींग मध्ये दलाल बसतो “अजय” अशा नावाचा. तो दलाली ठरवतो आणि ती दलाली ठरली की त्याची डिलिव्हरी होते मातोश्री पासून पाच बिल्डिंग लांब असलेल्या वैभव चेंबर या इमारतीमध्ये असा सनसनाटी आरोप यावेळी आमदार आशीष शेलार यांनी केला.










Be First to Comment