सिटी बेल| उलवे |
उलवे नोड मधील वहाळ ग्रामपंचायत हद्दीतील बामण डोंगरी गावातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे गावातील इतर नागरिकांना नाहक त्रास सहन करवा लागत आहे.
उलवे नोड विकसित होण्यापूर्वी संपूर्ण गावात बैलगाडी फिरत होती. तसेच काही भागात ट्रक जात असल्यामुळे मध्यभागतील नागरिकांना घरातील सामान, इतर साहित्य ने-आण करण्यात सोईस्कर होत होते. परंतु गेल्या नऊ-दहा वर्षांपासून अंतर्गत रस्त्यावर अतिक्रमणे केल्यामुळे नागरिकांना समानाची ने-आण करणे मुश्किल झाले आहे. एखादी व्यक्ति आजारी पडल्यास गावात रुग्णवाहिका येऊ शकत नाही, त्यामुळे नागरिकांना योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता वाढल्या आहेत.

या गावातून अनेक ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून गेले परंतु या गंभीर समस्येवर दुर्लक्ष केल्यामुळे या गावाचे सुज्ञ नागरिक तथा ‘अभेद्य प्रहार’ चे संपादक प्रकाश म्हात्रे यांनी सन २०१९ मध्ये वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी एन. जी. केणी यांना पत्र लिहून अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली.
ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर सरपंच व कर्तव्यनिष्ट ग्रामविकास अधिकारी एन. जी. केणी यांनी प्रकाश म्हात्रे यांच्या पत्राची दखल घेऊन बामणडोंगरी गावातील अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणेबाबत ठराव मंजूर करून गावातील रस्त्यांची मोजणी करण्यासाठी भूमीअभिलेख पनवेल यांना २७/०२/२०२० रोजी रु. ७८०००/- मोजणी फी भरण्यात आली.
परंतु कोरोनाच्या महामारीमुळे आजपर्यंत मोजणी न झाल्यामुळे तसेच आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊन सरकारी कार्यालये व कर्मचारी १००% क्षमतेने उपस्थिती झाली असल्याने प्रकाश म्हात्रे यांनी दि. २१ आॅगस्ट २०२१ रोजी पुन्हा वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी एन. जी. केणी यांना पत्र लिहून बामणडोंगरी गावातील अंतर्गत रस्त्याची मोजणी करण्यासंदर्भात आठवण करून देत अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली आहे.
ग्रामविकास अधिकारी एन. जी. केणी यांचा कर्तव्यनिष्ट कार्यकाळ
गेल्या सहा वर्षांपासून वहाळ ग्रामपंचायतमध्ये अनेक विकास कामे झाली असून ग्रामविकास अधिकारी एन. जी. केणी यांनी अत्यंत नियोजन पद्धतीने एक सचिव म्हणून काम केले आहे. एन. जी. केणी यांनी ग्रामपंचायतमधील वहाळ, बामणडोंगरी, मोरवे, जावळे या सर्व गावातील नागरिकांशी सलोख्याचे संबंध ठेऊन ग्रामपंचायतीचा कारभार हाताळला.
ग्रामपंचायतमधील नागरिकांना योग्य ते सहकार्य करून गावांच्या विकासावर भर दिला. ग्रामपंचायतीला येणारा विकासनिधीचा वापर योग्य पद्धतीने करून नागरिकांच्या समस्या सोडवल्या. त्यातच वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या योग्य व नियोजनबद्ध धोरणांमुळे ग्रामविकास अधिकारी एन. जी. केणी यांना ग्रामपंचायतीच्या विकासात सहकार्य लाभले. असे ग्रामविकास अधिकारी ज्यांची आज बदली झाल्यामुळे येणाºया दुसºया ग्रामविकास अधिकारी यांच्यावर विकासाची मोठी जबाबदारी असून नागरिकांच्या समस्या कशा सोडविल्या जाणार हे पुढील काळात दिसून येईल.








Be First to Comment