सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू )
कोरोना कोविड १९ च्या महामारीत रक्ताचा तुडवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ही अडचण लक्षात उरणमधील पालवी सामाजिक संस्थेने गुरुवार दि. ३० जुलै रोजी भेंडखळ गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या महामारीच्या परिस्थितीमुळे हे रक्तदान शिबिर खुल्या परिसरात न ठेवता विशिष्ट व्हॅनमध्ये संपन्न होणार आहे. ज्यांनी तीन महिन्यापासून रक्तदान केलेले नसेल आपण त्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन पालवी सामाजिक संस्थेने केले आहे.
हे शिबीर विशेषतः थेलेसेमिया रुग्णांसाठी राबविण्यात येत आहे. या आजारात काही पेशंट्सना १४ दिवसात तर काहींना २१ दिवसात रक्त भरावे लागते. आपल्या उरणमध्ये ही असे पेशंट आहेत.
तरी आपण रक्तदान करावे आणि आपला कुणी मित्र वा नातेवाईक जे नियमित रक्तदान करतात त्यांना या शिबिरात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.






Be First to Comment