गोर बंजारा ज्ञानपीठ लोधिवली येथे पार पडला कार्यक्रम
सिटी बेल | रसायनी | सुनिल ठाकूर |
सर्व देवी देवता संत महापुरुष यांचे एकत्र दशर्न एकाच तिर्थ क्षेत्रात घेता यावे या उद्देशाने लोधिवली येथे संत सेवालाल महाराज यांच्या पुण्य भूमीत सर्व देवी देवता साधू संत महापुरुष यांच्या मूर्ती असलेले भव्य दिव्य असलेले सुंदर मंदिर इन्फ्राटेकचे मालक तथा धर्म सेवक किसन भाऊ राठोड यांनी बांधले या मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कलशारोहण कार्यक्रम नुकताच विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला
पालखी आगमन संत महात्मा देवी देवतांचे आगमन, मान्यवर नायक पंचायत पाहुणे यांचे आगमन, आतिषबाजी, भव्य स्वागत वाजा,गांजा,डफडा नृत्यगित भजन व भव्य स्वागत सोहळा रात्री 8:00 वाजता भोग-महाआरती संत महापुरुष नायक यांचे हस्ते रात्री 9:00 वाजता महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम-यामध्ये बंजारा परंपरागत थाळी-नगारा भजन संध्या बंजारा पारंपारिक नृत्य/कला/सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
सकाळी 8:00 वाजता झेंडावंदन,9:00 महाभोग, महाआरती, महाप्रसाद सकाळी 10:00वाजता देशभरातील उपस्थिती सर्व साधूसंत- महापुरुष स्वागत सन्मान .सकाळी 11:00वाजता गोरबोली कॅडर कॅम्प दुपारी 2:00वाजता गोरबोली चर्चा , प्रश्नोत्तरे, दुपारी 2:30वाजता महाप्रसाद 3:30गोरबंजारा गोरबोली साहित्य परिषद- यावेळी गोर ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. गोरबंजारा साहित्य दिंडी भव्य मिरवणूक-साहित्य परिषद-यामध्ये विषय-गोरधर्म आत्मचिंतन पुनरावलोकन सायंकाळी 7:00 वाजता कवी संमेलन-देशभराती ल प्रमुख कवीचा सुमधुर कार्यक्रम 9:00वाजता सांस्कृतिक कार्यक्रम रात्री 11:00वाजता कलापथक, भजन, जागरण सोमवार दिनांक 16 सकाळी 8:00वाजता प.पू. रामराव बापू यांच्या आस्थी कलश दर्शन सोहळा 9:00वाजता गोरबंजारा देवी देवता साधू संत महापुरुष मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा संपन्न.10:00वाजता गोरधर्म, ध्वजारोहण,महाभोग आरती, महाप्रसाद 11:00वाजता संत महात्म्यासह धर्मपीठ धर्मपुरुष साधूसंत पूजन व महाआरती भावभक्तिमय परिषद दुपारी 1:00वाजता महाप्रसाद 2:00 राजकीय परिषद या बंजारा समाजाच्या मागण्यांवर चर्चा व भूमिका यावेळी राजकारणातील तरुणांना संदेश यावेळी राजकीयाक्षेत्रात काम करणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषद तफै सन्मान सोहळा पार पडला.
यामध्ये सेवा रत्नपुरस्कार .गोरबंजारा ज्ञानपीठ पुरस्कार,विशेष गौरव,कोविड योध्दा पुरस्कार तसेच गोरबंजारा समाजातील सर्व संघटनाचा सन्मान करण्यात आला. या तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमांचा व दर्शनाचा लाभ देशभरातून आलेल्या गोरबंजारा समाजातीलअसंख्य भाविकांनी घेतला.
Be First to Comment