सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील बाहे गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व क्रुषीनिष्ठ शेतकरी ह.भ.प.केशव सहादेव जाधव यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा दु:खद निधन झाले.
सामाजिक क्षेत्र व वारकरी सांप्रदायात तळमळीने काम करून शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करून आपला उदरनिर्वाह करणारे स्व.केशव जाधव हे कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून सर्वपरिचित होते.त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजतात त्यांचे आप्तस्वकीय व मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,नातवंडे, पतवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी बुध.दि.२५ आँगस्ट रोजी तर अंतिम धार्मिकविधी २७ आँगस्ट रोजी हे दोन्ही विधी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment