चार हजार गृहपयोगी वस्तूंचे किट : १४ ट्रक महाड साठी तर १३ ट्रक सामान चिपळून साठी रवाना
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात नुकसान झालेल्या महाड चिपळूण साठी अनेकांनी एक हात मदतीचा हात पुढे केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर-हवेली मतदारसंघाकडून आमदार अशोक रावसाहेब पवार आणि माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा जि.प पुणे च्या सदस्या सौ. सुजाता अशोक पवार यांच्या अथक प्रयत्नातून एक हात मदतीचा शिरूर-हवेली जनतेचा व राव लक्ष्मी फाउंडेशन तर्फे महाड पूरग्रस्तांसाठी व चिपळूण पूरग्रस्तांसाठी 51 विविध वस्तूंचा किट तयार करून २७ ट्रक भरून महाड व चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आला.
रायगडच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत किट सुपूर्द करण्यात आले. या जीवनावश्यक किटमध्ये तांदूळ, साखर, तेल, चहा पावडर, बेसन, साबुदाणा, गहू, बाजरी, ज्वारी, औषध, तवा, कढई, पातेली, पळी, गाळणी, फिनाईल, पाणी बॉटल, चपला, लहान मुलांचे कपडे, कांदा गोणी, भुईमूग, अंगाचे कपड्याचे साबण, कोलगेट, खारी, बिस्कीट, 35 लिटर क्षमतेचे पाण्यासाठी ड्रम, मग, बाटली, ब्लॅंकेट, साडी, मॅगी सारख्या अशा वस्तूंचे वेगवेगळे किट तयार करून 51 वस्तूंचा एक किट तयार केला.
विशेष म्हणजे सुजाता ताई पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली अपार मेहनतीने, आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर हवेली मतदार संघातील तमाम कार्यकर्त्यांनी स्वतः रात्रंदिवस मेहनत घेऊन पूरग्रस्तांसाठी वस्तू एकत्र करून त्या वस्तूंचे वेगवेगळे किट तयार करून २७ गाड्यांचा ताफा सुतारवाडी येथील गीताबाग मध्ये रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती सांगून पूरग्रस्तांसाठी किट वाटप करण्या संबंधी विनंती केली.
यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार अँड.अशोक पवार, माजी सभापती जिल्हा परिषद पुणे च्या सदस्या सौ. सुजाता अशोक पवार, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, पंडित दरेकर, राजेंद्र दरोडे, बाबासाहेब फराटे, मनिषा ताई सोनवणे, प्रदीप कंद, रंजना जांभरे, भाऊ वारगडे, स्वप्निल गायकवाड, शिवाजी कदम तसेच अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शिरूर हवेली मतदार संघातील आमदारांसह अन्य कार्यकर्त्यांच्या 15 गाड्यांचा ताफा सुतारवाडी येथे आला होता.
ज्यावेळी महाड, चिपळूण येथे पूरस्थिती निर्माण झाली तेव्हापासून आपल्या जीवाची, खाण्याची, राहण्याची जरा ही पर्वा न करता खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे हे त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पूरग्रस्तांची रात्रंदिवस सेवा करत होते. १५ दिवस ते तिथेच पूरग्रस्तांना मदत कार्य करत होते. त्यांचा आदर्श घेऊन अनेक सेवाभावी संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीचा ओघ सुरू केला. पूरग्रस्तांनी तटकरे कुटुंबीयांना मनापासून धन्यवाद देऊन संकटकाळी भरीव मदत केल्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली.








Be First to Comment